जोत्याजी केसरकर[1, 2, 3, 4]
-
Name जोत्याजी केसरकर Gender Male Person ID I723 Maratha Empire Last Modified 17 Feb 2024
Children 1. केदारजी केसरकर + 2. मानाजी केसरकर 3. भवानजी केसरकर Last Modified 17 Feb 2024 Family ID F419 Group Sheet | Family Chart
-
Sources
- [S25]
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
म.द. रुमाल १ ( पृ०११९-१३६)
केसरकर, जोत्याजी, [म.द. रुमाल १ ( पृ०११९-१३६)]
'जोत्याजी, ( स्वारीबरोबर जरीपटका वाहणारा)
अजहत देशमुख ( छत्रपतीच्या तर्फेने वागणारा)
शाहू छत्रपतिचा निष्ठावंत सेवक, पादचाही के जन्मभर चाकरी;
राहणार केसरी (नजीक सावंतवाडी ).
- [S59]
गर्वाने मराठी, गर्वाने मराठी, https://www.garvanemarathi.com/2021/03/Shambhuraje-kaid-ani-jotyaji-kesarkar.html .
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर दऱ्याखोऱ्यांत गोंगावणारे पराक्रमाचे वादळ होय. पण आच पराक्रमी वादळाला आणि स्वराज्याच्या छत्रपतीना मुकर्रब खानाने दगा फटका करून आणि फितुरांच्या मदतीने संगमेश्वरी कैद केले. संभाजी महाराज पकडले गेले ती तारीख होती १ फेब्रुवारी १६८९. पण साडे-तीनशे वर्ष झाली, लाखो लोकांच्या मनात प्रश्न येत आहेत, संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती मग संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न का झाला नाही? संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा मराठे काय करत होते? संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी एकाही मावळ्याने प्रयत्न केले नाहीत का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे प्रयत्न आम्ही या लेखांमध्ये केलेले आहेत, त्यातीलच हा एक भाग!
संभाजी महाराजान सोडवण्याचा प्रयत्न हा झाला होता. हा प्रयत्न कोणी केला? कोण होता हा जिगरबाज मावळा? छत्रपती संभाजी महाराजांना कैद केल्यावर मुकर्रब खानाने आपल्या सैन्याला आदेश दिला कि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर संभाजी महाराजांना संगमेश्वरातून बहादुरगडाकडे घेऊन चला. मुकर्रब खानाची हजारोंची फौज निघाली. संभाजी महाराजांना कैद करून घेऊन जाणारी सैन्याची हि तुकडी बत्तीस शिराळ्याच्या जवळ आली. त्याचवेळी एका स्वामिनिष्ठ मावळ्याला समजले कि आपला राजा कैद झाला आहे. तो मावळा होता जोत्याजी केसरकर! जोत्याजीना काही कळेना, काहीही करून राजांना वाचवले पाहिजे हे त्यांनी ठरवले. जोत्याजीनी आसपास असलेले मावळे गोळा केले. जास्त संख्या नव्हती ती फक्त १०० च्या आतच असावी!
आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदार होऊन हे मावळे लढायला लागले. मोघली फौजेवर त्यांनी हल्ला केला. जोत्याजी वाऱ्याच्या वेगाने गनिमांना कापत सुटला होता, इतर मावळे गनिमांना सपासप तलवारीने कापत होते. मोगलांच्या हजारोंच्या फौजेसमोर १०० मावळ्यांचे बळ तोकडे पडले. आपल्या राजाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने लढणारे मावळे कापले गेले. जोत्याजीनी स्वतःच्या अंगावर तलवारीचे वार सोसले. शिराळ्याच्या जंगलात झाडा-झुडूपात मावळे कोसळले. संभाजी महाराजांना सोडवण्याचा पहिला प्रयत्न अखेर अपयशी ठरला.
- [S60]
Bol Bhidu, Bol Bhidu, https://bolbhidu.com/., https://bolbhidu.com/jyotyaji-kesarkar-shambhu-maharaja/.
शंभूराजांच्या सुटकेसाठी लढणाऱ्या ज्योत्याजी केसरकरांच्या नावाने सातारच्या गादीने अख्खी पेठ वसवली
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या संघर्षाचा धगधगता इतिहास. शिवछत्रपतीसारख्या सिंहाचा हा छावा. त्यांच्या पराभवासाठी खुद्द औरंगजेब बादशाह महाराष्ट्रात उतरला. मुघलांचे मोठ मोठे सरदार याच उद्देश्याने जंग जंग पछाडत होते. एवढेच नाही तर इंग्रज, पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्धी, म्हैसूर असे सगळे बलाढ्य शत्रू स्वराज्यावर डूख धरून होते
या साऱ्यांशी संभाजी महाराजानी एकाच वेळी झुंज दिली. त्यांचा पराभव केला. पण शंभूराजांचा घात केला तो स्वकीयांनी.
संगमेश्वर येथे त्यांच्यावर दगाफटका झाला. फितुरांच्या मदतीने मुघल सरदार मुकर्र्बखानाने मोठ्या सैन्यासह हल्ला केला. मराठ्यांचे संख्याबळ कमी पडले. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत.
सेनापती म्हाळोजी घोरपडे व अनेक वीर या प्रसंगी धारातिर्थी पडले. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.
विद्युत वेगाने त्यांना औरंगजेबाकडे नेण्यासाठी बहादूरगडाच्या दिशेने मुकर्र्ब खान निघाला.
अनेक जणांना प्रश्न पडतो की संगमेश्वर ते बहादूरगड या जवळपास साडे तीनशे किलोमीटरच्या अंतरात महाराजांना वाचवण्यासाठी कोणीच पुढ आलं नव्हतं का?
तर याच उत्तर आहे अनेकांनी यासाठी प्रयत्न केले होते.
यात सर्वात पहिला हल्ला केला होता ज्योत्याजी केसरकर यांनी.
ज्योत्याजी केसरकर संभाजी महाराजांचे अंगरक्षक होते. महाराजांच्या प्रत्येक स्वारी शिकारीच्या प्रसंगी ते सोबत असायचे. मात्र संगमेश्वरच्या बैठकीत ते हजर नव्हते. जेव्हा त्यांच्या कानावर ही बातमी पडली तेव्हा ते पेटून उठले. कोणत्याही आज्ञेची वाट पहात बसले नाहीत. स्वराज्याचा पोशिंदा मुघलांच्या ताब्यात गेला आहे आणि त्याला आपल्याला सोडवून आणायचं आहे हेच त्यांच्या डोक्यात होतं.
त्यांनी काही धनगर मुलांची तुकडी त्यांनी तयार केली.
मुकर्र्बखान मोठी तयारी करून आला होता. त्याचा हा हल्ला अचानक झाला नव्हता तर त्याने या कारवाईची आखणी व त्यानंतर बहादूरगडाला जायचं नियोजन अत्यंत काळजीपूर्वक केल होतं. पण तरीही बत्तीस शिराळा जवळ अचानक झालेल्या हल्ल्याने तो थोडासा गोंधळला.
उणे-पुरे शंभर मावळे घेऊन जोत्याजी मोघलांवर तुटून पडले होते.
आपल्या राजाला सोडवण्यासाठी जीवावर उदार होऊन हे मावळे समोर येईल त्याला कापत सुटले होते. सगळ्यात आघाडीवर असलेल्या ज्योत्याजीना हजारोंच्या गर्दीत साखळदंडानी बांधले गेलेले स्वराज्याचे छत्रपती दिसत होते.
जीवाच्या आकांताने हे मावळे लढत होते मात्र त्यांचं बळ तोकड पडलं.
मुघलांचा संख्याबळाचा जोर मोठा होता. दुर्दैवाने सगळे मावळे धारातिर्थी पडले. रक्ताने न्हाऊन निघालेले ज्योत्याजी केसरकर सुद्धा त्या शिराळ्याच्या जंगलात जमिनीवर जखमी होऊन कोसळले.
संभाजी महाराजांना सोडवण्यात ते अपयशी ठरले. असाच शेवटचा प्रयत्न संभाजी महाराजांचे दुसरे अंगरक्षक रायाप्पा महार यांनी देखील केला होता. मात्र त्यांना औरंगजेबाच्या सैनिकांनी ठार केलं.
क्रूर औरंगजेब बादशाहने संभाजी महाराजांचे हाल हाल केले.
त्यांचे डोळे काढले, कातडी सोलून काढली, त्यांची धिंड काढली. मात्र शेवटपर्यंत शंभू राजांनी आपला स्वभिमान सोडला नाही. अखेर त्यांच्या व कवी कलशाचा शिरच्छेद करण्यात आला व शरीराचे तुकडे तुकडे करून तुळापुर वढू येथे फेकून देण्यात आले.
मराठी सत्तेसाठी हा मोठा धक्का होता. महाराणी येसूबाई यांच्या नेतृत्वाखाली राजधानी रायगडावर नेटाने लढा देण्यात आला. मात्र पुन्हा एकदा स्वकीयांच्या गद्दारीमुळे मुघलांना अजिंक्य अशा रायगडावर विजय मिळवता आला.
राजाराम महाराज सुखरूपपणे पन्हाळा व तिथून दक्षिणेत जिंजीला निघून गेले. मात्र येसूबाई राणीसाहेब आणि युवराज शाहू महाराज मुघलांच्या तावडीत अडकले.
संभाजी महाराजांशी क्रूरपणे वागणाऱ्या औरंगजेबाने शाहू महाराजाना त्रास दिला नाही. पंचवीस वर्ष तो महाराष्ट्रात राहून मराठ्यांना संपवण्यासाठी तडफडत राहिला मात्र संताजी धनाजी अशा सरदारांनी ताराराणी बाईसाहेबांनी लढा चालू ठेवला.
मराठ्यांच्या चिवटपणामुळे अखेर औरंगजेब बादशाह मराठी मातीत गाडला गेला.
युवराज शाहू महाराजांची सुटका झाली. त्यांनी महाराष्ट्रात परत येऊन छत्रपतीपदावर हक्क सांगितला. करवीरपाठोपाठ सातारा येथे स्वराज्याची स्वतंत्र गादी निर्माण झाली.
शाहूराजांना औरंगजेबाने नासधूस केलेलं स्वराज्य परत उभा करण्याच आव्हान समोर होतं. अशावेळी त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यामध्ये सर्वप्रथम होते संभाजी महाराजांचे निष्ठावंत सेवक ज्योत्याजी केसरकर.
औरंगजेबाच्या कैदेत असतानाही शाहू महाराज व येसूबाईराणीसाहेब यांच्या विश्वासात तेच होते.कैदेत असतानाच शाहूरायांच लग्न जुळवण्यात देखील त्यांनीच पुढाकार घेतला होता.
सातारच्या दरबारात ज्योत्याजीनां प्रमुख सल्लागारांमध्ये स्थान दिल.
शाहू महाराजांनी त्यांना सरदेशमुखी दिली, १८ कारखान्याचा अधिकार दिला. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून सातारा शहरात केसरकर पेठही वसवली.
आजही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पुनाळ या छोट्याश्या गावात संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी जिवाचं रान करणाऱ्या जोत्याजी केसरकरांची समाधी आपल्यास पाहायला मिळते.
- [S27]
इतिहासाच्या पाऊलखुणा, (Facebook), https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna., https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/3424244441195419/.
निष्ठा म्हणजे काय जर कुणी विचारलं तर असंख्य मावळ्यांची नाव आपल्या समोर येतात पण मराठ्यांच्या समृद्ध इतिहासातील एक महान आणि सर्वोच्च निष्ठावंत म्हणजे #जोत्याजी_कृष्णाजी_केसरकर.
जोत्याजी केसरकर हे कोल्हापुरातील पुनाळ गावचे,पन्हाळा गडाच्या पायथ्याशी असलेलं हे छोटसं गाव.छत्रपती संभाजी महाराजांच्या अगदी जवळचे म्हणून त्यांचा उल्लेख इतिहासात सापडतो.छत्रपती शिवाजी राजे,छत्रपती संभाजी राजे आणि छत्रपती थोरले शाहू राजे या 3 राजांच्या पदरी निष्ठा अर्पण करणारा #जोत्याजी_केसरकर हा एकमेव मावळा.
छत्रपती संभाजी राजांना मुघलांनी धोक्याने गपचूप कैद केले,होईल तितक्या लवकर संभाजी राजांना गुप्तपणे मुघली मुलखात घेऊन जायची गडबड चालू होती.संभाजी राजांना पकडल्याची बातमी वाऱ्याच्या वेगासारखी पुनाळ गावात पोहचली आणि जोत्याजी च्या काळजात वणवा पेटला.
जोत्याजी नेहमी संभाजी राजांच्या सोबत अंगरक्षका सारखे असायचे,नेमकं या वेळी राजांनी त्यांना सोबत नेलं नाही आणि हा प्रसंग घडला.जोत्याजींनी घोडी सज्ज केली पाहता पाहता 100 मावळा सज्ज झाला.आप्पाशास्त्री दिक्षित आणि जोत्याजी केसरकर संभाजी राजांना वाचवण्यासाठी सज्ज झाले.मुखरबखानाचा तळ बत्तीस शिराळा जवळ पडला होता.एका बाजूने जोत्याजी आणि एका बाजूने आप्पा शास्त्री दिक्षित दोन तुकड्या करून 100मावळे घेऊन हजारो मुघलांच्या सैन्य सागरात आपल्या राजाला वाचवण्यासाठी शिरले.लढणाऱ्या मावळ्यांना मृत्यू समोर दिसत होता पण प्रत्येकाच्या पहाडी छातीत असलेल्या काळजात त्यांच्या संभाजी राजे त्यांना दिसत होता.जीवाची पर्वा न करता 100 मावळा आपल्या राजाला शोधत होता.आप्पा शास्त्री दिक्षित पडले त्यांना वीरमरण आलं.हळूहळू निष्ठवंतांची गर्दी कमी होऊ लागली.निष्ठवंतांच्या लालभडक इनामी रक्ताच्या अभिषेकाने ती 32 शिराळ ची भूमी पवित्र झाली.आपल्या राजाच्या रक्षणासाठी त्या तळावर 100 मावळे क
कामी आले.एकमेव जोत्याजी केसरकर जखमी अवस्थेत कसतरी त्या वेढ्यातून बाहेर पडले ते थेट रायगडावर आले.
दुर्गराज रायगडावर सगळे काळजीत होते.तोच जुल्फिकार खान नावाचा एक मुघल सरदार रायगडाला वेढा देऊन बसला.महाराणी येसूराणी यांनी राजाराम राजांचा राज्याभिषेक करून त्यांना जिंजी कडे पाठवून दिले.
रायगडावर राजांचा कुटुंब कबिला होता.संभाजी राजांना वीर मरण आलं सारा रायगड हळहळला.8 महिने रायगड लढला.सारी रसद संपली आणि रायगड मुघलांच्या ताब्यात द्यायची वेळ आली तेव्हा राज परिवार सोडता सर्वांना सुखरूप सोडणार होते.
जोत्याजी केसरकर सहज रायगड किल्ल्यावरून सुटणार होते पण जोत्याजीच्या काळजातली निष्ठेची ज्योत त्यांना येसूराणी आणि बाळ शिवाजी राजांना सोडून जायला तयार न्हवती.स्वतःहून जोत्याजी कैद झाले आणि आपलं उर्वरित आयुष्य संभाजी महाराजांच्या पुत्राची सेवेत घालवण्यासाठी ते मुघलांच्या कैदेत गेले.
ओरगजेबाने बाळ शिवाजी च नाव शाहू ठेवलं,त्यांना 7 हजारी मनसबदारी दिली.त्यांच्या पदरी कैदेत असलेले जोत्याजी केसरकर कायम ठेवले.जवळजवळ 18 वर्ष शाहू राजांच्या सोबत जोत्याजी केसरकर ढाली सारखे उभे राहिले.रुस्तुमराव जाधवरावांच्या मुलीचा विवाह शाहू राजांसोबत लावून द्यायला जोत्याजींनी मद्यस्ती केली होती.
शाहू राजांसोबत कैदेत वाट्याला आलेली सुख दुःख भोगत जोत्याजींनी शाहू राजांच्या मनात स्वराज्याची धग आणि मावळ्यांच्या पराक्रमाचा कथा कायम ठेवत ठेवल्या त्यातूनच शाहू राजांच्या मनात राजा बनायची ऊर्जा निर्माण झाली.शाहू राजांचे शिक्षक म्हणून जोत्याजींनी कामगिरी पार पाडत शाहू राजांच्या रूपाने एक सक्षम आणि धोरणी,राजकारणी,कार्यक्षम राज्यकर्ता घडवला.
एक कथा सांगितली जाते.औरंगजेबाच्या छावणीत सरपण शिल्लक न्हवत औरंगजेब इतका गरीब झाला होता की सरपण विकत ग्यायला सुद्धा त्याच्याकडे पैसे न्हवते.आशा वेळी शाहू राजांना सुद्धा उपासमार सहन करावी लागत होती तेव्हा एकदा आई जगदंबे चा पोत जाळून त्यावर जोत्याजींनी भात शिजवला होता.ही फक्त एक कथा सांगितली जाते.त्याला काही संदर्भ सापडले तर तशी पोस्ट येईल.
पुढं औरंगजेब मेल्यावर शाहू राजांच्या सोबत 200 लोकांची सुटका झाली.येसूराणी आणि राजपरिवरातील काही लोक ओलीस म्हणून मुघल दिल्लीला सोबत घेऊन गेले.
जोत्याजी केसरकर शाहू राजांच्या सोबत महाराष्ट्रात आले.शाहू राजांनीं अवघ्या एक वर्षात स्वतःचा राज्याभिषेक केला.त्यात राजांच्या बीनीच्या हत्तीवर स्वराज्याच जरी पटका भगवा घेऊन छत्रपतींच्या सैन्याच नेतृत्व करायची जबाबदारी जोत्याजी केसरकर यांच्या सोपवली.
1719 मध्ये शाहू राजांनी आखलेल्या दिल्ली मोहिमेत जोत्याजी केसरकर होते.दिल्लीच्या बदशहासोबत झालेल्या तहाची काही कागदपत्रे आणि सनदा मिळायला उशीर होणार होता तेव्हा जोत्याजी दिल्लीत एकटे थांबले आणि सर्वात शेवटी सनदा घेऊन सुरक्षित स्वराज्यात आले.
थोरले शाहू राजांसोबत कैदेत 18 वर्ष असल्याने जोत्याजी केसरकर अजून अविवाहित होते.शाहू राजांनी जोत्याजींना लग्न करायचा सल्ला दिला.जोत्याजींचं लग्न झालं.जोत्याजींनी सरदेशमुखी होती.केदारजी, मनोजी आणि भवानी ही जोत्याजी केसकरांची अपत्ये शाहू राजांनी जोत्याजींच्या मृत्यूनंतर या मुलांना आगासखेड परगण्यातल्या सेवगावची देशमुखी दिल्याचं पत्र शाहू दप्तर मध्ये पाहायला मिळत.शाहू राजांनी जोत्याजीच्या स्मरणार्थ सातारा शहरात केसरकर पेठ निर्माण केली ती आजही पाहायला मिळते.
आशा या महान स्वामिनिष्ठ मावळ्याची समाधी/स्मारक पुनाळ गावात आहे.
लेखन - #मंगेश_गावडे_पाटील
संदर्भ -
1) शाहू दप्तर
2)शेडगावकर भोसल्यांची बखर
3) छत्रपती थोरले शाहू महाराज चरित्र
- [S25]
Comments | अभिप्राय
Comments written here will be public after appropriate moderation.Like us on Facebook to send us a private message.