रामचंद्र गणेश कानडे[1, 2, 3]

Male - 1780


Personal Information    |    Sources    |    Event Map    |    All

  • Name रामचंद्र गणेश कानडे 
    Gender Male 
    Died 12 Dec 1780  Vajreshwari, Maharashtra, India Find all individuals with events at this location 
    Person ID I683  Maratha Empire
    Last Modified 15 Nov 2022 

    Father गणेशभट कानडे 
    Family ID F399  Group Sheet  |  Family Chart

    Children 
    +1. माधवराव कानडे
    Last Modified 14 Nov 2022 
    Family ID F400  Group Sheet  |  Family Chart

  • Event Map
    Link to Google MapsDied - 12 Dec 1780 - Vajreshwari, Maharashtra, India Link to Google Earth
     = Link to Google Earth 
    Pin Legend  : Address       : Location       : City/Town       : County/Shire       : State/Province       : Country       : Not Set

  • Sources

    1. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
      पेशव्यांचा सेनानी, जरीपटक्याचा अधिकारी, कों. ब्रा., गोत्र शांडिल्य. स. १७३८ च्या दिल्लीस्वारीचा चालक [( १) इ.वृ. १८३७ ले. १, शकावल्या, (२) पे. द., २९ २८३ ]

      माधवरावाचा सेनानी, मृ. १२ डिसें. १७८० वज्रयोगिणीवर

      प्रस्तुत वंश जागीरदार सातोणा, द. हैदराबाद


    2. [S55]
      discovermh.com, discovermh.com, (discovermh.com), https://www.discovermh.com/., https://www.discovermh.com/ramchandra-ganesh-kanade/.
      रामचंद्र गणेशांचा प्राणत्याग!

      शके १७०२ च्या मार्गशीर्ष व. १ रोजी मराठेशाहीतील सुप्रसिद्ध वीर रामचंद्र गणेश कानडे यांनी वज्रेश्वरीजवळ इंग्रजांशी लढता लढतां प्राणत्याग केला. या वेळी इंग्रजांनी वसई या महत्त्वाच्या ठाण्यावर हल्ला करून ते हस्तगत करण्याचा विचार केला होता. दोनतीन दिवसांपूर्वीच किल्ल्यावर तोफा डागल्या गेल्या होत्या. गॉडर्डनें वसई घेण्याचा निश्चय केला होता, अशा आणीबाणीच्या प्रसंगी नानांनी जुना कसलेला सेनापति रामचंद्र गणेश यास वसईस मदतीसाठी म्हणून पाठविले. रामचंद्र गणेश घाटांतून जात असतां इंग्रज सेनानी हार्टले व मुसा नारन यांनी त्याला अडविले.
      वज्रेश्वरी उर्फ वज्रयोगिनीचा पर्वत सुप्रसिद्ध असून त्याचा आश्रय लढाऊ फौजांस चांगलाच होता. काहीहि होवो, पण वसईस मदत पोचवून इंग्रजांचा पराभव करावयाचा हा निश्चय रामचंद्र गणेशाचा होता. हार्टले व मुसा नारन यांच्याशी निकराचा सामना झाला. मार्गशीर्ष व. १ या दिवशी धुके पडलेले होते. तेव्हां न दिसतां रामचंद्र गणेश हार्टले याला पकडण्यास अगदी तोफखान्याजवळ आला आणि आतां शत्रूस हस्तगत करणार तों अभ्रपटल दूर होऊन एकदम स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. मराठे शूर गडी अगदीच जवळ आल्याचे हार्टलेच्या ध्यानी येतांच त्याने तोफांचे बार केले. मराठे मुळीच डगमगले नाहीत.
      अशा या भयंकर प्रसंगीहि ते तोफ पकडण्यास धांवले. इतक्यांत एक गोळा रामचंद्र गणेश यांस लागला व ते तात्काळ ठार झाले. परमेश्वरहि इंग्रजांची साह्यकर्ता झाला. अभ्रसुदर्शन वज्राबाईने जर दूर केले नसते तर लढाईचा रंगच बदलला असता; पण मराठ्यांच्या दुर्दैवाने विपरीतच घडले. आणि रामचंद्र गणेश धारातिर्थी पतन पावले. आदल्याच दिवशी वसई इंग्रजांच्या हाती आलेली होती. या दोन गोष्टींमुळे मराठे जास्तच खवळून गेले आणि पुढे त्यांनी प्रचंड आवेशाने युद्ध करून गॉडर्डला तह करण्यास भाग पाडले. अशा प्रकारें रामचंद्र गणेशाच्या मृत्यूमुळे अधिक महत्त्वाची कामगिरी झाली. रामचंद्र गणेश यांनी लढाईचे शिक्षण सदाशिवरावभाऊंच्या हाताखाली घेतले होते.


    3. [S26]
      केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-09/10483-2013-03-05-05-27-57.html.
      उत्तरपेशवाईंतील एक प्रसिद्ध सेनापति व मुत्सद्दी. शाहूनें याला इनाम दिलें होतें. नाना, साहेब व थोरले माधवराव यांच्या कारकीर्दीत कर्नाटक उत्तरहिंदुस्थान वगेरे हिंदुस्थानच्या सर्व भागांत यानें अनेक मोहिमा व कामगिर्‍या केल्या. याचें लढाईचें शिक्षण सदाशिवरावभाऊसाहेब यांच्या हाताखालीं झालें होतें. जानोजी भोंसल्यावरील थोरल्या माधवरावांच्या स्वारींत रामचंद्रपंतावर श्रीमंतांचा मुख्य भरंवसा होता. त्यानंतर लागलीच जी उत्तरेत स्वारी झाली तिचा सर्व अखत्यार पंताकडेच दिलेला होता. पानपतामुळें रजपूत, जाठ, राहिले व वजीर (सुजा उद्दौला) वगैरे लोक मराठयांच्या विरुद्ध उठले होते, त्यांची खोड मोडण्याचें काम पंताकडे सोंपविलें होतें, तें त्यानीं शिंदेहोळकरांच्या मदतीनें उत्तम तर्‍हेनें पार पाडलें. शहा अलम बादशहास इंग्रजांच्या व सुजाच्या ताब्यांतून काढून मराठयांच्या ताब्यांत आणण्याचें व दिल्लीची पातशाही पेशवाईच्या पंखाखालीं घालण्याचें अवघड काम पंतानें केलें (१७७१). बिनीवाले व कानडे यांच्यांत तंटा उपस्थित झाला तेव्हां पेशव्यानीं पंतास दक्षिणेंत परत बोलाविलें (१७७२). ही मानखंडना त्या शूर पुरुषास सहन न झाल्यानें त्यानें संन्यास घेण्याचा बेत केला, पण श्रीमंतानीं त्याची समजूत केली. यानंतर बारभाईच्या पक्षांत बरींच वर्षे पंतानें कामगिरी केली. शेवटीं खंडाळ्याच्या लढाईंत इंग्रजांशी लढत असतां पंतानें धारातीर्थी देह ठेविला (ता. १२-१२-१७८०). त्यांच पुत्र माधवराव यानेंहि मराठेशाहींत बरीच कामगिरी केली. पंताचा वाडा पुण्यास शनिवारवाडयाच्या उत्तरेस नदीच्या कांठीं होता. हा वाडा व त्याचें नक्षीकाम अतिशय प्रेक्षणीय होतें. १९२४ सालीं शनवारवाडयापुढें नवा पूल झाला तेव्हां हा वाडा पाडण्यांत आला. [पेशवेबखर; खरे. भा. ७; अहवाल १८३७;म. रि.भा. ४.]





Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.