कंठाजी कदमबांडे[1, 2, 3]

Male


Personal Information    |    Sources    |    All

  • Name कंठाजी कदमबांडे 
    Gender Male 
    Association मल्हारराव होळकर (Relationship: मल्हारराव होळकर कंठाजी कदमबांडे यांच्या सेवेत होता.) 
    Person ID I586  Maratha Empire
    Last Modified 12 May 2022 

    Family ID F351  Group Sheet  |  Family Chart

    Children 
    +1. चतुर्सिंग कदमबांडे
    Last Modified 12 May 2022 
    Family ID F366  Group Sheet  |  Family Chart

  • Sources

    1. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).


    2. [S26]
      केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-41-27/1999-2012-11-07-09-58-56.
      कदम कंठाजी - कंठाजी कदम बांडे हा पुणें जिल्ह्यांतील बांड्याच्या वडगांवचा रहाणारा होता. ताराबाईच्या पदरीं दाभाडे सेनापतीच्या हाताखालीं अमृतराव कदम हा एक मोठा शूर पुरुष होऊन गेला. यानें खानदेशांत नंदुरबार, सुलतानपुर, प्रांतीं अंमल बसविला. खाफीखान याला अंबु असें म्हणतो. शाहुमहाराज मोंगलाकडून सुटून आल्यानंतर खानदेशांत त्यांनां जे सरदार मिळाले त्यांत अमृतराव हा होता. याचाच तिसरा मुलगा कंठाजी कदम. हाहि बापाप्रमाणेंच शूर होता. याला पश्चिम खानदेशांत रनाळे, तोरखेडें, कोपरली हीं गांवें पेशव्यांनीं इनाम दिलीं. याच्याकडे २०० स्वारांची पागा होती व गुजराथप्रांतीं याची नेमणूक होती. याच्या पुतण्यास शाहुमहाराजांनीं आपली मुलगी (गजराबाई) दिली होती. तोरखेडें येथील मूळच्या राउळानें बंड करून रनाळें व नंदुरबार प्रांतात त्रास दिला. तो मोंगलांचा चाकर होता. त्याचा मोड कंठाजीनें करून तें गांव जहागीर मिळविलें. पुढें तें डेंगळे यांनीं जप्‍त केलें होतें, परंतु सुटलें. स. १७१० त धनाजी जाधवराव वारला तेव्हां शाहूची स्थिति फारच नाजूक होती. त्यावेळीं जी शेलकी मंडळी शाहूस चिकटून राहिली तींत कंठाजी होता. खानदेश, गुजराथ इकडे हा दंगल उडवीत असे. उदाजी पवार, पिलाजी गायकवाड यांच्या बरोबरीनें तिकडे हा काम करी.

      इ.स.१७२४ साली कंठाजी कदम यानें निजामाचा काका, गुजराथचा नायब सुभेदार, हमेदखान यास नवीन नेमणूक झालेल्या सरबुलंद खान नामाक सुभेदाराकडून कारभार पहाण्याकरितां आलेल्या शुजायत खानाविरुद्ध मदत करून, गुजराथेंत चौथ वसूल करण्याचा हक्क मिळविला. परंतु पुढें एके प्रसंगीं हमेदखानानें पिलाजी गायकवाडाचीहि मदत घेऊन चौथ बसविण्याचा हक्क गायकवाड व बांडे यांच्यामध्यें सारखा वांटून दिला (१७२५). एकदां खंबायत येथून पैसा घेण्याकरितां हे दोघेहि त्या गांवीं गेले असतां गांवकरी लोकांनीं युक्तीनें या दोघांमध्यें कलागत लावून दिली. तेव्हां कंठाजी कदम व गायकवाड यांच्यांत त्या गांवाजवळच लढाई होऊन तींत गायकवाडाचा मोड झाला; व कंठाजी कदमानें गांवकरी लोकांकडून खंडणी वसूल केली. यानंतर हमेदखानानें दोघांत तडजोड करून देऊन कंठाजी कदम यानें माहीनदीच्या पश्चिमेकडील व गायकवाडानें पूर्वेकडील चौथ वसूल करावी असें ठरविलें (१७२५).

      इ.स. १७२५ त कंठाजी कदम यानें हमेदखानास मदत करून अहमदाबादेजवळ 'अदालेदजे' येथें सरबुलंदखानाच्या सैन्याचा पराभव केला. परंतु या लढाईत मराठ्यांची बरीच प्राणहानि झाल्यामुळें त्यांनीं मिळविलेल्या जयाचा हमेदखानास फायदा करून घेतां आला नाही; व म्हणून सरबुलंदखानास सर्व प्रांतांतून आपले फौजदार नेमतां आले.

      सरबुलंदखानानेंहि गुजराथ प्रांताची चौथ पूर्वीप्रमाणेंच कंठाजी कदम याजकडे चालू ठेविली; परंतु मुलखाच्या संरक्षणाच्या कामीं खानाच्या अपेक्षेप्रमाणें कंठाजीचा कांहींच उपयोग होत नसे.

      इ.स. १७३१ त कंठाजी कदम बांडे हा आपला भाऊ रघुजी कदम यासह बाजीरावाविरुद्ध लढण्याकरितां त्रिंबकराव दाभाड्यास येऊन मिळाला होता. परंतु ता. १ एप्रिल १७३१ रोजीं झालेल्या लढाईंत पहिलाच हल्ला आल्याबरोबर यानें आपल्या लोकांसह समरांगणांतून पलायन केलें.

      स. १७२७ तील निजामाच्या स्वारींत हा हजर होता. या कंठाजीच्या पांगेतच प्रसिद्ध मल्हारराव होळकर हा अगदीं प्रथम शिलेदार होता. पुढें मल्हारराव व कंठाजी यांनीं, (दमाजी गायकवाडानीं गुजराथ सोडून जावयास लाविल्यामुळें) १७३४ मध्यें माळव्यांतून गुजराथच्या उत्तरभागीं उतरून पालनपूर, अहमदाबाद, ईदर या प्रांतांत धुमाकूळ घालून पुष्कळ लूट मिळविली. यापुढें कंठाजीचें नांव ऐकू येत नाहीं. याला चत्रसिंग म्हणून मुलगा होता. याचा वंश खानदेशांत वरील जहागीरगांवीं आहे (म. रि. कैफियती; डफ).


    3. [S39]
      मराठी विश्वकोश, (मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ), https://vishwakosh.marathi.gov.in/., https://vishwakosh.marathi.gov.in/20243/.
      होळकर, मल्हारराव : (१६ मार्च १६९३–२० मे १७६६). मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी व इंदूर संस्थानचे संस्थापक. त्यांचा जन्म होळ (जेजुरीजवळ) येथे धनगर घराण्यात झाला. वडील खंडूजी हे शेतकरी असून चौगुला-वतनदार होते. मल्हारराव तीन वर्षांचे असतानाच वडील वारल्यामुळे आई त्यांना घेऊन खानदेशात तळोदे येथे भोजराज बार्गल या भावाकडे गेली. भोजराजाने आपला पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय बाजूला ठेवून एक पथक उभे केले होते. तो कंठाजी कदमबांडे यांच्या सेवेत होता. त्यामुळे मामाकडेच मल्हाररावांना लष्करात नोकरी मिळाली. १७२० मधील पेशवे-निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोड-दळात घेतले (१७२१). त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली.





Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.