संतकवि एकनाथ[1, 2, 3, 4, 5]

-
Name , एकनाथ Title संतकवि Born 1533 Paithan, Maharashtra, India Gender Male Died 1599 Person ID I563 Maratha Empire Last Modified 25 Apr 2022
Father सूर्यनारायण Mother रुक्मिणी Family ID F341 Group Sheet | Family Chart
Family गिरिजाबाई Children + 1. मुदगल, गोदावरी 2. उमा + 3. हरि पंडित Last Modified 25 Apr 2022 Family ID F344 Group Sheet | Family Chart
-
Event Map = Link to Google Earth
Pin Legend : Address
: Location
: City/Town
: County/Shire
: State/Province
: Country
: Not Set
-
Sources
- [S26]
केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-56/1071-2012-10-17-11-24-51.
एकनाथ - महाराष्ट्र संत व कवि (एकनाथाचा जन्म शके १४७० मध्यें (रा. पांगारकरांच्या मतें १४५०) पैठणास झाला. पूर्वी भानुदास या नांवाचा एक भगवद्भक्त देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण पैठणांत होऊन गेला. त्याच्याच वंशांत एकनाथ हा जन्मला. भानुदासाचा मुलगा चक्रपाणी, चक्रपाणीचा सूर्यनारायण व सूर्यनारायणाचा एकनाथ अशी एकनाथांची पितृपरंपरा आहे. एकनाथाच्या आईचें नांव रूक्मिणी. एकनाथाच्या जन्मानंतर त्याचीं मातापितरें लवकरच निवर्तलीं. यामुळें एकनाथाचें सर्व पालनपोषण त्याचा जो आजा चक्रपाणी त्यानेंच केलें. लहानपणापासूनच एकनाथाचें चित्त परमेश्वराकडे वळलेलें होतें. दगडाचे देव मांडून त्यांची पूजा करावी व कांहीं तरी पुराणांतील गोष्टी सांगून कीर्तन करावें, अशा तर्हेचे याचे खेळ असत. याची साहाव्या वर्षी मुंज होऊन पुढें विद्याभ्यासास सुरूवात झाली. एकनाथची बुद्धि फार तीव्र होती, यामुळें गुरूनें दिलेली संथा त्याला तेव्हांच पाठ होई, असें त्याचे बहुतेक चरित्रकार सांगतात. रीतीप्रमाणें ब्रह्मकर्माचें सर्व म्हणणें पुरें झाल्यावर एक दिवस एकनाथास असा दृष्टांत झाली कीं, देवगिरीस जनार्दनपंत हा दत्तोपासक आहे, त्याचा अनुग्रह घ्यावा. याप्रमाणें एकनाथानें जनार्दनपंताकडे जाऊन त्याचा अनुग्रह घेतला व त्याजपाशीं पुढील ज्ञान संपादन केलें. जनार्दनपंतानें एकनाथास शके १४८० मध्यें कालयुक्त संवत्सरी उपदेश दिला व एकनाथनें ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांचें अध्ययनहि जनार्दनस्वामीपाशींच केलें. स्वामीच्या आज्ञेनें चतु:श्लोकी भागवत या ग्रंथास एकनाथानें टीका लिहिली. ती फारच सरस आहे. चतु:श्लोकी भागवताचें हें विवरण पाहून जनार्दनस्वामींनीं लवकरच आपल्या या शिष्यास श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंधावर व्याख्यान करण्यास सांगितलें. पैठणास नाथानें लेखनास आरंभ करून विक्रमशक वृषसंवत्सर १६३० या सालीं कार्तिक शुद्ध पौर्णिमेस सोमवारीं हा ग्रंथ पुरा केला. या अपूर्व ग्रंथाचे ३१ अध्याय असून त्याची ओंबीसंख्या सुमारें २० हजार आहे. भागवत संपविल्यानंतर लागलीच पुरे पांच महिने लोटले नाहींत तोंच एकनाथानें 'रूक्मिणीस्वयंवर' लिहिलें. याचे १८ अध्याय असून ओंवीसंख्या सुमारें दोन हजार आहे. एकनाथाच्या चरित्रपर अथवा पौराणिक ग्रंथांपैकीं हा अगदीं पहिला ग्रंथ दिसतो. 'श्रीकृष्णानें श्रीखंड्याच्या रूपानें' 'स्वकरें चंदन घासलें' व 'कावडीनें गंगेचें पाणी' भरलें, त्याच्या स्मरणार्थ हा कृष्णाचा स्वयंवरवृत्तांत नाथांनीं सांगितला आहे असें म्हणतात. भागवताच्या आधारानें दोन प्रचंड ग्रंथ लिहिल्यावर या पौराणिक ग्रंथाच्या वेळीं वेदांतविषय कवीच्या अगदीं दृष्टीआड झाला होता असें नाहीं. पौराणिक आख्यानांवर रचलेले दुसरे लहान लहान ग्रंथ 'बालक्रिडा' 'प्रल्हदचरित्र' व 'शुकाष्टक' हें होत. 'प्रल्हादचरित्र' हें लहानसें १७६ ओव्यांचें प्रकरण जसें सुरस आहे, तसेंच १४४ ओव्यांचें 'शुकाष्टक' हि आहें. हीं आख्यानें रचून एकनाथानें प्रथमच आख्यान वाड्:मयाचा पाया घातला व मराठींत काव्यरस ओतला. 'शुकाष्टका' शिवाय शुकाष्टकाच्या आधारें अथवा टीकात्मक असा रचिलेला 'स्वात्मसुख' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. अद्वैतावर हा लहानसा ग्रंथ फारस उत्कृष्ट उतरला आहे. स्वात्मानुभवाप्रमाणेंच 'आनंद-लहरी' 'अनुभवानंद' आचार्यांच्या हस्तामलकावरील टीका, चिरंजीवनद, गीतासार, मुद्राप्रकाश वगैरे हे सर्व ग्रंथ वेदांतपर असून अद्वैतमतप्रधान आहेत. यांखेरीज पदें, भारूड वगैरे लहान लहान चुटके आणि अभंग अशी विविध रचना एकनाथानें केली आहे.
हे लहानसान ग्रंथ लिहीत असतांना फार मोठें असें एक मराठी भाषेंसंबंधाचें काम एकनाथानें आरंभिलें. तीनशें वर्षापूर्वी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या प्रती मिळवून तो ग्रंथ प्रतिशुद्ध करण्यास आरंभ केला. ज्ञानेश्वरीच्या समाधीचा जीर्णोद्धार केल्यावर त्यांच्या कृतीच्या अवशिष्ट भागाचाहि जीर्णोद्धार करण्याची कल्पना एकनाथास सहजासहजीं सुचली असावी. एकनाथानें आळंदीस जाऊन ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार शके १५०५ मध्यें जेष्ठांत केला आणि नंतर वर्ष सव्वा वर्षानें म्हणजे शके १५०६ च्या भाद्रपदांत ज्ञानेश्वरीचा जीर्णोद्धार पुरा झाला. ज्ञानेश्वरीप्रमाणेंच अमृतानुभवासंबंधींहि कांहीं खटपट करून हा ग्रंथ महाराष्ट्रीयांस सुभल करून देण्याचा एकनाथानें यत्न केला असावा. यावर एकनाथानें प्रत्यक्ष एक टीका लिहिली असावी असा विद्वांनांचा तर्क आहे; परंतु ही टीका हल्लीं संपूर्ण उपलब्ध नाहीं असें रा. भावे म्हणतात. (सरदार मेहेंदळे यांनीं अमृतानुभवावरील एकनाथकृत टीकेचें एक पृष्ठ रा. वि. का. राजवाडे यांच्या हवालीं केलें होतें).
एकनाथाचा ग्रंथरचनेचा अद्योग अखेरपर्यंत सतत चालू होता असें दिसतें. आपल्या पूर्ववयांत यानें भागवतसारखा ग्रंथ मराठींत आणिला व त्यावर टीका रचिली. तसेंच उत्तरवयांतहि यानें दुसरा एक मोठा ग्रंथ रचण्याचा उपक्रम केला. हा ग्रंथ रामायण हा होय. मूळ रामायणाच्या आधारें हा ग्रंथ मराठींत लिहिण्यास सुरूवात अगदीं साठीच्या सुमारास केली असावी असें दिसतें. 'भावार्थरामायण' ग्रंथ युद्धकांडाच्या ४४ व्या अध्यायापर्यंत रचून झाल्यावर एकनाथाची प्रकृति विशेष क्षीण झाली आणि ग्रंथरचनेचे परिश्रम त्याच्यानें होईनात, तेव्हां पुढील ग्रंथ पुरा करण्याचें काम आपला एक शिष्य गावबा याजवर एकनाथानें सोंपविलें.
एकनाथाच्या उपरिनिर्दिष्ट ग्रंथांपैकीं बहुजनमान्य व सर्वांगसुंदर ग्रंथ म्हटला म्हणजे भागवत एकादश स्कंधावरील विस्तृत टीका हा होय भागवतांतील या भागाला उद्धवगीता असेंहि म्हणतात. नाथांचें चरित्र म्हणजे या ग्रंथांतत प्रामुख्यानें प्रतिपादिलेल्या (अ. २, ३, ५, २९ पहा.) भागवतधर्मरहस्याचें प्रत्यक्ष केवळ उदाहरणच होय. या विषयाचें विवरण करतांना नाथांची वाणी रसाळ, प्रसंगविशेंषीं 'प्रासादिक' कवित्वानें स्फुरलेली, समर्पक दृष्टांतांनीं खुटलेली, सद्भावानें आर्द्र झालेली, प्राकृत जनांसहि गुंगवून त्यास सात्विकवृत्तिप्रवण करणारी, वक्तृत्वाची व निरूपणकुसरीची साक्ष पटविणारी व विवेचक अशी स्पष्ट दिसून येते. तसेंच भारदस्तपणांत परमार्थाचें उद्धाटन करण्याच्या कामीं संस्कृत भाषेला मराठी भाषा रेंसभरहि हार जाणार नाहीं ही बाब स्पष्टोक्तीनें व स्वरचनेच्या ठाकठिकीनें एकनाथानें निदर्शनास आणून दिली आहे. एकनाथाचा एतद्विषयक कटाक्ष बिलकुल अस्थानीं नाहीं हें उघड आहे. ज्ञानेश्वराचें अनुकरण करून एकनाथानें भारूडाची रचना करितांना रूपकें योजण्यांत अनुपम चातुर्य दाखविलें आहे. नित्याच्या व्यवहारांतीलच गोष्टी घेऊन व तात्कालीन समाजांत चालू असलेल्या विविध धंद्यांस अनुरूप अशी रोचक भाषापद्धति घालून आत्मज्ञान परोपरीनें विशद व सुगम करण्याची खुबी या चटकदार रचनेंत एकनाथाला ठळकपणें साधली आहे. या बहरीच्या रचनेंत मात्र एकनाथाचें कवित्व जसें निर्विवादपणें दिसून येत आहे तसें त्याचें योजकत्वहि पट आहे. हा शके १५५१ मध्यें फाल्गुन वद्य षष्ठीस समाधिस्थ झाला. नाथाच्या जन्मशकाप्रमाणें मृत्युशकहि निश्चित नाहीं. आर्वाचिन कोशकार, रा. सहस्त्रबुद्धे (श्रीएकनाथमहाराजचरित्र) यांच्याप्रमाणेंच तो शके १५३१ धरतात. अर्वाचीन मराठी भाषेचा जनक म्हणून एकनाथाची योग्यता मोठी आहे. ज्ञानेश्वर व एकनाथ यांच्या मध्यें साडेतीनशें वर्षाचा काळ लोटला आहे. तेव्हां या दोघांच्या वेळची मराठी भाषा विचारांत घेतां असें दिसून येईल कीं, ज्ञानदेवाच्या वेळीं भाषेंत जुनीं रूपें आणि त्यांचे अम्थिर प्रकार फार होते. एकनाथाची भाषा सुसंस्कृत व अधिक स्थिरावलेली दिसते. ज्ञानेश्वर व एकनाथ यांमधील काळांत मराठी भाषा संस्कृत पेहरावानें विशेष नटली, तिनें पूर्वीचे गांवढळ शब्दप्रचार टाकून दिले व प्रौढपणा धारण केला. म्हणून या दोघांच्या भाषेंत फार फरक आढळतो. ज्ञानेश्वरापासून मोरोपंतापर्यंत सर्व ग्रंथकारांनीं आध्यात्मिक विषयाच्या विवेचनासाठीं ओवीबद्ध छंद वापरला आहे; तेव्हां एकनाथाचाहि पाठ होता हें सांगणें नकोच. नाथाची ओवीं साडेचार चरणीं असून शेवटच्या चरणांत अनुप्रास साधलेला आढळतो एकनाथाच्या काव्याचा मासला म्हणून रूक्मिणीस्वयंवरांतील (अ. १५) रूक्मिणीवर्णन पहा:-
भिंवई सुरेख सरळ नासिक । गंडस्थळीं तेज अधिक । नाकींचे मोतीं जडित माणिक । तेणें श्रीमुख शोभत ॥ सुरंग तळवे आणि तळहात । अधरबिंब अति आरक्त । बोलीं मधुरता तळपत । तेणें झळकत दंतपंक्ति ॥ कटिप्रदेश शोभवी जघन । माज अतिशयेंसी सान । घोटी कळाविया सुलक्षण । बरवेपण पाउलां ॥ नेसली क्षीरोदक पाटोळा । त्यावरी नवरत्नाची मेखळा । सुनीळ कांचोळी वेल्हाळ । लेइली माथां मोतलग ॥ गंगातीरीचीं चक्रवाकें । तेंवि कुचद्वय सुरेख । हृदयीं घननीळ झळके । शोभा पदकें दाविजे ॥
विरहानलानें पोळणारी रूक्मिणी म्हणते:-
मज नलगे विंझणवारा । तेणें अधिकची होतो उबारा । प्राणरिघों पाहे पुरा । शारंगधरावांचोनी ॥ आंगीं न लावा गे चंदन तेणें अधिकचि होय दीपन । माझे निघों पहाती प्राण । कृष्णचरण न देखतां ॥ (अ. ५)
वेदांत सांगतांनाहि एकनाथाची वाणी अस्खलित व हृदयभेदी वाटते. स्वात्मुसुख ग्रंथांत आस्तिकनास्तिकासंबंधीं बोलतांना पुढील विवेचन केलें आहे:-
जैसे सूर्याचे किरण । सूर्यापुढें धांवती आपण । तेणें प्रकाशे सूर्यपणा अधिकाधिक ॥ कां चंदनास वासा चंदनाहुनि चौपसा धांवे तेणें अधिक प्रकाश । चंदनत्वा आणी ॥ तैसें विश्वप्रकाश तया गभस्ती । त्यांचीं किरणें त्या त्या नाना व्यक्ती । तेथें नास्तिकता जे देखती । ते मूर्ख मृगतृष्णिका ॥ मोत्यांची करूनियां भूषणें । अंगीं प्रत्यंगीं लेणें । बाणलिया सुंदरपणें । शोभे स्वयें ॥ तैसें हें स्वरूप निर्विकार । त्याचें सर्वांग भूषण चराचर । तेणें अलंकारालें मनोहर । स्वरूपचि भासे ॥ सुवर्ण आणि भूषण । तेथें काय आहे दोन्हीपण । प्रगट पाहतांही कांकण । सोनेंचि दिसे ॥ सौधपट पाहतां दृष्टी । तंतुसीच होय भेटी । तैसी अवलोकितां सकल सृष्टी । स्वरूपचि भासे ॥
एकनाथाच्या अभंगासंबंधीं विवेचन 'अभंग' या लेखांत आलेंच आहे.
एकनाथाची साधु म्हणून मोठी ख्याति आहे. त्यानें केलेले चमत्कार महिपतीनें भक्तिविजयांत वर्णिले आहेत. एकनाथ अस्पृश्यता जातिभेद वगैरे सामाजिक दोष मानीत नव्हता असें दाखवून देणार्या कांहीं कथाहि सांगतात
[संदर्भ ग्रंथ:- महाराष्ट्रसारस्वत. एकनाथाचीं स्वतंत्र सहा चरित्रें आहेत, त्यांपैकीं एक रा. ल. रा. पांगारकर यांनीं लिहिलें आहे. अर्वाचीन कोश व कविचरित्र यांत एकनाथावर लेख आहेत, भक्तिविजय व भक्तलीलामृत या पुराणांतून एकनाथांच्या आख्यायिका वर्णिल्या आहेत, याशिवाय किरकोळ वाङ्मय बरेंच आहे].
- [S51]
श्री दत्त महाराज - www dattamaharaj. com, श्री अवधूत नागेश उंडे, (श्री अवधूत नागेश उंडे), http://www.dattamaharaj.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5., http://www.dattamaharaj.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5.
जन्म: १५३३, पालनपोषण भानुदास महाराज (आजोबा)
आई/वडील: रुख्मिणी/सुर्यनारायण
कार्यकाळ: १५३३ ते १५९९
संप्रदाय: वारकरी
गुरु: जनार्दन स्वामी
समाधी/निर्वाण: इ. स. १५९९, फाल्गुन व ६, कृष्णकमल तीर्थात जाऊन आत्मा ब्रम्हांडात विलीन
वाड्गमय:
१. एकनाथी भागवत
२. भावार्थ रामायण
३. ज्ञानेश्वरी शुद्धीकर
४. रुख्मिणी स्वयंवर
जन्म व बालपण
संत एकनाथांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन १५३३ पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा.
Continued on reference site.
- [S39]
मराठी विश्वकोश, (मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ), https://vishwakosh.marathi.gov.in/., https://marathivishwakosh.org/57011/.
एकनाथ, संत : (१५३३–१५९९). महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संतकवी. जन्म पैठण येथे. संत भानुदासांचे पणतू. वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे रुक्मिणी. त्यांचे वडील मोठे पंडित असावेत, असे एक मत आहे. बालपणीच आईवडील निवर्तल्यामुळे एकनाथांचे संगोपन त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केले. वयाच्या बाराव्या वर्षी एकनाथांनी देवगिरी येथील जनार्दनस्वामींकडे जाऊन त्यांचे शिष्यत्व पतकरले. तेथे सहा वर्षे राहून संस्कृत शास्त्रपुराणांचे व ज्ञानेश्वरीसारख्या अध्यात्मग्रंथांचे अध्ययन त्यांनी केले. गुरुकृपेने परमेश्वरी साक्षात्कार झाल्यावर एकूण सात वर्षे त्यांनी तीर्थयात्रेत घालविली. या तीर्थयात्रेत प्रथम काही दिवस जनार्दनस्वामी त्यांच्याबरोबर होते. तीर्थयात्रेनंतर त्यांनी गृहस्थाश्रभ स्वीकारला. गिरिजा हे त्यांच्या पत्नीचे नाव. एकनाथांना हरिपंडित नावाचा एक मुलगा आणि गोदा, गंगा या नावाच्या दोन मुली होत्या. कर्नाटकातील डंबळ येथील बाळकृष्णवंत चंद्रकेत ह्यांना दुसरी मुलगी दिली होती. प्रसिद्ध मराठी पंडित कवी मुक्तेश्वर हा गोदेचा मुलगा. कवी शिवराम पूर्णानंद हा नाथांचा मुलीकडून पणतू. हरिपंडित हा कर्मठ व सनातनी असल्याने काही काळ एकनाथांचा विरोधक होता. आळंदीस जाऊन नाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला (१५८३) आणि त्यानंतर ज्ञानेश्वरीची संहिता शुद्ध केली (१५८४). पैठण येथेच फाल्गुन वद्य षष्ठीस त्यांनी देह ठेवला. अस्पृश्याच्या चुकलेल्या मुलास कडेवर घेऊन महारवाड्यात पोहोचवणे, श्राद्धाला ब्राह्मण येईनात, तेव्हा शिजवलेले अन्न अस्पृश्यांना खाऊ घालणे व गाढवाला गंगोदक पाजणे यासारख्या एकनाथांच्या चरित्रातील आख्यायिकावरून अद्वैत वेदान्ताचा व्यापक अर्थ त्यांच्या अंगी प्रत्यक्ष बाणलेला होता, हे दिसून येते. एकनाथ, विठा रेणुकानंदन, जनी जनार्दन, रामा जमार्दन आणि दासोपंत ह्या पाच समकालीन सत्पुरुषांना नाथपंचक म्हटले जाते. यांपैकी दासोपंतांची बरीच आणि जनी जनार्दनांची काही मराठी रचना उपलब्ध आहे. चतुःश्लोकी भागवत (सु. १५५५) ही नाथांची पहिली रचना. भागवत पुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ श्लोकांवरील १,०३६ ओव्यांचे हे भाष्य आहे. सृष्टीच्या आद्यंती असलेल्या नारायणाचे व भागवत धर्माचे निरूपण त्यात आढळते. प्राकृत भाष्यग्रंथांना पंडितवर्गाकडून होणार्या विरोधाचे पडसाद येथे उमटले आहेत.
वरील भाष्यानंतर एकनाथांनी काही आध्यात्मिक स्वरूपाची स्फुट प्रकरणे लिहिली. शंकराचार्याच्या हस्तामलक या चौदा श्लोकांच्या स्तोत्रावर ६७४ ओव्यांची रसाळ टीका त्याच नावाने त्यांनी लिहिली. शुकाष्टक हे प्रसिद्ध संस्कृत अष्टकावरील ४४७ ओव्यांचे विवरण आहे. स्वात्मसुखात ५१० ओव्या असून गुरुस्तवन, अद्वैतभक्ती व भक्तिमार्गातील परमार्थ हे विषय त्यात आले आहेत. आनंदलहरीतील १५० ओव्यांत आत्मस्थितीतील आनंदाचे व गुरुभक्तांचे वर्णन आहे. चिरंजीवपदात साधकाला उपदेश केलेला आहे.
रुक्मिणी स्वयंवर (१५७१) हे भागवत संप्रदायातील पहिले व परंपराप्रवर्तक आख्यानक काव्य होय. भागवताच्या दशम स्कंधातील अध्याय ५२ ते ५४ मधील १४४ श्लोकांच्या व हरिवंशातील विष्णुपर्वाच्या अध्याय ५९-६० च्या आधारे एकनाथांनी त्याची रचनी केली. त्याची ओवीसंख्या १,७१२ आहे. श्रीकृष्ण-रुक्मिणीचा विवाह म्हणजे जिवाशिवांचे मीलन, अशा रूपकाभोवती हे संपूर्ण काव्य रचलेले आहे. या काव्याचा प्रभाव पुढील अनेक कवींवर पडलेला दिसतो. कृष्णदयार्णव ह्या कवीने तर आपल्या हरिवरदा या रचनेत प्रस्तुत काव्य संपूर्णपणे अंतर्भूत केले. एकनाथी भागवत ही एकनाथांची सर्वश्रेष्ठ रचना होय. भागवत पुराणाच्या एकादश स्कंधावरील ही विस्तृत टीका आहे.
भावार्थ रामायण ही त्यांची अखेरची रचना. वाल्मीकी रामायण, अध्यात्म रामायण, क्रौंच रामायण, आनंद रामायण, योगवासिष्ठ इ. ग्रंथांच्या आधारे ही रचना केलेली आहे. ‘बाल’, ‘अयोध्या’, ‘अरण्य’, ‘किष्किंधा’, ‘सुंदर’ ही पहिली पाच कांडे आणि सहाव्या युद्ध कांडाचे ४४ अध्याय लिहून झाल्यानंतर नाथांनी देह ठेविला. त्यापुढील भाग गावबा नावाच्या त्यांच्या शिष्याने पूर्ण केला, असे परंपरा सांगते. याशिवाय मुक्तेश्वर, कोनेरीसुतशेष व एक अनाम कवी यांनी ‘एका-जनार्दन’ या नावानेच ‘उत्तर’कांड लिहून भावार्थ रामायणाच्या पूर्तीचे प्रयत्न केले आहेत. भावार्थ रामायणाचे स्वरूप रामचरित्रावरील स्वतंत्र पौराणिक महाकाव्यासारखे आहे. एकनाथांच्या आवडत्या आध्यात्मिक रूपकांबरोबरच या काव्यात सामाजिक रूपकात्मताही आढळते. तत्कालीन यवनी सत्तेचा मराठी समाजावर झालेला अंतर्बाह्य अनिष्ट परिणाम त्यातून सूचित केला आहे.
या रचनांखेरीज बहुजनसमाजासाठी एकनाथांनी केलेली कथात्मक रचनाही वेधक आहे. सुबोध शैलीने लिहिलेल्या तुळशीमाहात्म्य व सीतामंदोदरीची एकात्मता या पुराणकथा, सांसारिकांच्या मनोवृत्तीचा आल्हादक व विनोदरम्य आविष्कार करणार्या हळदुली व कृष्णदान ह्या श्रीकृष्णकथा, कृपण माणसाचे हास्यजनक स्वभावचित्र रेखाटणारे कदर्यु-आख्यान, ध्रुव, प्रल्हाद, उपमन्यू आणि सुदामा यांच्या नाट्यपूर्ण लघुचरित्रकथा आणि ज्ञानेश्वरादी संतांच्या संक्षिप्त जीवनकथा ही अशा रचनेची उदाहरणे होत. एकनाथांनी गेय पदरचनाही केली आहे. ही पदे मुख्यतः श्रीकृष्ण-चरित्रपर आहेत. त्यांत सुंदर शब्दचित्रे, भावपूर्णता, कल्पकता, ध्रुव-पदांची वेधकता, मार्मिक तत्त्वसूचकता इ. वैशिष्ट्ये आढळतात. ‘वारियाने कुंडल हाले’, ‘असा कसा देवाचा देव बाई ठकडा’ इ. त्यांची पदे प्रसिद्ध आहेत.
प्राचीन मराठीतील भारूडरचनेत नवचैतन्य, विविधता व विपुलता निर्माण करण्याचे कार्य एकनाथांनीच केले. १२५ विषयांवर सु. तीनशे भारुडे त्यांनी रचली. पुरातन काळापासून मराठी बहुजन-वर्गाचे आपल्या मनोरंजक व नाट्यपूर्ण गीतरचनेने रंजन करणार्या गोंधळी, भराडी, वासुदेव, डोंबारी, बाळसंतोष वगैरे जमातींचा एक वर्ग होता. एकनाथांनी त्यांच्या अलिखित लोककाव्याचे पुनरुज्जीवन केले. त्यांच्या कवित्वाची व्यापकता व लौकिकता यावरून स्पष्ट होते. आदिमाया, विंचू, जागल्या, कुडबुड्या जोशी या विषयांवरील त्यांची भारुडे प्रसिद्ध आहेत.
एकनाथांची बरीचशी रचना साडेचार चरणी ओवी छंदात आहे. त्यांनी स्फुट अभंगरचनाही केली आहे. गुरुभक्ती, पारमार्थिक अनुभव व सामाजिक स्थिती हे त्यांच्या अभंगांचे मुख्य विषय आहेत. त्यांत नामदेव-तुकारामांसारखा साधकदशेतील भावोत्कट अंतःकलह आढळतात नाही. रचनादृष्टीनेही एकनाथी अभंग सैल आहेत.
एकनाथांचे वाङ्मयीन, सांप्रदायिक व सांस्कृतिक कर्तृत्व त्यांच्या समन्वयवादी व्यक्तिमत्त्वाचेच निदर्शक आहे. प्रपंच व परमार्थ तसेच संतत्व आणि समाजोद्धार यांची यशस्वी सांगड आपल्या जीवनात त्यांनी घातली. जन्मजात स्वभावाबरोबरच तत्कालीन परिस्थितीनेही एकनाथांचे व्यक्तिमत्त्व घडविले. अडीच शतकांच्या ज्ञानेश्वरोत्तर कालखंडात संतसाहित्याची परंपरा खंडित व विस्कळित झाली होती. एकनाथांनी त्या पूर्वपरंपरेचे भान ठेवून वाङ्मयनिर्मिती केली म्हणूनच ती परंपरा अखंड, एकात्म व प्रगमनशील राखण्याचे कार्य ते यशस्वीपणे करू शकले. ज्ञानेश्वरीच्याच परंपरेतील पण अधिक सुबोध भाष्यग्रंथ म्हणजे भागवत होय. भागवतामुळे वामनपंडित, शिवकल्याण, रमावल्लभदास यांसारख्या कवींना भाष्यरचनेतील स्थिर बैठक लाभली. त्यांच्या भावार्थ रामायणामुळे मुक्तेश्वरासारख्या कवीला रामायण व महाभारत यांच्या रूपांतराची दिशा लाभली. रुक्मिणी स्वयंवराने तर आख्यानक काव्याचा नवा प्रवाहच मराठीत रूढ केला. बहुजनसमाजाला रूपके समजतात व आवडतात, म्हणून एकनाथांच्या रूपकप्रचुर शैलीचा अवतार झाला. मराठीचा पुरस्कार करतानाही, सर्वसंग्राहक भाषादृष्टीने त्यांनी संस्कृत भाषेचे प्रौढत्व तिला प्राप्त करून दिले आणि आपल्या भारूडरचनेत बोलीभाषेचाही स्वीकार केला. वीररसाचा आविष्कार, अभंगरचनेतील भेदक समाजचित्रण, कीर्तनोपयोगी नाट्यपूर्ण कथाकाव्य यांही बाबतींत संतसाहित्यातील पहिले कर्तृत्व एकनाथांचेच आहे. संतत्वात अभिप्रेत असलेल्या लोकसंग्रहाचे, लोकसेवेचे व लोकाद्धाराचे साधन म्हणूनच एकनाथांनी कवित्वाची साधना केली म्हणूनच त्यांच्या काव्यरचनेत आशयाभिव्यक्तीचे वैचित्र्य व वैपुल्य निर्माण झाले.
तेराव्या शतकात ज्ञानेश्वर-नामदेवांनी बहुजनसुलभ भक्तिमार्गाची प्रतिष्ठापना केली. पुढील अडीच शतकांत यवनी सत्तेमुळे भक्तिमार्गाचा प्रभाव क्षीण झाला. एकनाथांनी त्या भागवत पंथाचे प्रभावी पुनरुज्जीवन केले. आपल्या भागवत टीकेने भक्तिपंथाची त्यांनी शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली आणि बहुजनवर्गाचा मेळावा त्या पंथाभोवती संघटित केला. भागवत पंथाला अशा प्रकारे शास्त्र आणि समाज यांचे दुहेरी अधिष्ठान त्यांनी प्राप्त करून दिले. जनताजनार्दन हे एक नवे तत्त्व प्रतिपादून भागवत पंथाला त्यांनी अधिक लोकाभिमुख बनविले. या पंथाला श्रीकृष्णाप्रमाणेच श्रीराम हे दैवत नव्याने परिचित करून दिले व रामचरित्राचा वीरवृत्तिपोषक व कालोचित भावार्थही कथन केला. एकनाथांचा भागवतधर्म व रामराज्याची कल्पना म्हणजे मध्ययुगीन महाराष्ट्रातील प्रेरक विचारधन होय. मराठी भाषा, वाङ्मय, विचार आणि वर्तन या सर्व क्षेत्रांत त्यांनी समाजप्रबोधन व समाजसंघटन केले. त्यातूनच सतराव्या शतकातील स्वराज्याच्या चळवळीला अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली, असे म्हणता येईल.
संदर्भ :
तुळपुळे, शं. गो. पाच संतकवि, पुणे, १९६२.
फाटक, न. र. श्री एकनाथ : वाङ्मय आणि कार्य, मुंबई, १९५०.
भावे, वि. ल. महाराष्ट्र सारस्वत, मुंबई, १९६३.
श्री एकनाथ संशोधन मंदिर, श्रीएकनाथ-दर्शन, २ खंड, औरंगाबाद, १९५२.
- [S52]
WIKI.MR.एकनाथ, Wikipedia, (Wikipedia), https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5.विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेतएकनाथ महाराष्ट्रातील एक संतमाध्यमे अपभारण करा विकिपीडिया
जन्म तारीख इ.स. १५३३ (१५८४ च्या पूर्वीच्या ग्रेगोरियन तारखेसह विधान)
महाराष्ट्रमृत्यू तारीख इ.स. १५९९ व्यवसाय - कवी
- तत्त्वज्ञ
अधिकार नियंत्रण संत एकनाथ मंदिर, पैठण जीवन
सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ (जन्म : पैठण, इ.स. १५३३; - इ.स. १५९९) हे महाराष्ट्तील वारकरी संप्रदायातले एक संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. एकनाथांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे या दरबारी अधिपती होते. हे मुळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते दत्तोपासक होते. गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. नाथांनी परिश्रम करून गुरूसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले; द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.
नाथांनी पैठणजवळच्या वैजापूर येथील एका मुलीशी विवाह केला. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडीत त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली. हरीला प्रल्हाद, मेघश्याम व राघोबा अशी तीन अपत्ये झाली. पैकी केवळ मेघश्याम या मधल्या मुलाचा मूळ वंश सद्य स्थितीत पैठण येथे अस्तित्वात आहे. कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत.
ज्ञानेश्वर|संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन व प्रबोधन केले. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.
’एकनाथी भागवत’ हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. रुक्मिणीस्वयंवर हेही काव्य त्यांनींच लिहिले आहे. दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) त्यांची आरती गणपतीसमोर गायच्या आरत्यांपैकी एक आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकनाथांनी ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य (एकनाथ षष्ठी हा) दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.
परंपरा
एकनाथांची गुरुपरंपरा :
- नारायण (विष्णू)
- ब्रह्मदेव
- अत्री ऋषी
- दत्तात्रेय
- जनार्दनस्वामी
- एकनाथ
एकनाथांची शिष्यपरंपरा : संत एकनाथ महाराजांच्या शिष्य शाखा महाराष्ट्र आणि बाहेरही मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. त्यापैकी काही , श्री नारायणगड (बीड), श्री भगवानगड (नगर), एकाजनार्दनी नाथपीठ (अंजनगावसुर्जी), श्री अमृतनाथस्वामी मठ (आळंदी), श्री तुकाविप्र महाराज (पंढरपूर,अंजनवती), श्रीकृष्णदयार्णव महाराज (पैठण, भारतातील सर्व मठ), श्री गोपालनाथमहाराज (त्रिपुटी, सातारा)
एकनाथांची वंशपरंपरा : संत एकनाथांच्या वंशजांची अनेक घरे पैठण आणि बाहेरही आहेत. उपलब्ध माहितीनुसार नाथांच्या नंतर त्यांच्या वंशजांनी त्यांची वारकरी संप्रदायाची आणि दत्त संप्रदायाची धुरा नेटाने चालविली. कीर्तन आणि गायन याद्वारे त्यांनी त्या त्या काळी छाप पाडल्याचे अनेक कागदपत्राद्वारे लक्षात येते. त्यांच्यातील पहिले रामचंद्र (भानुदासबाबा) यांचा उल्लेख ग. ह. खरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ११ गुरूंपैकी एक असा केलेला आहे. छय्याबुवा म्हणून चौथ्या पाचव्या पिढीत एक सत्पुरुष होऊन गेले त्यांच्या संबंधी अनेक कथा सांगितल्या जातात. सहाव्या सातव्या पिढीतील काशिनाथबुवा व रामचंद्रबाबा (२रे) यांचा मोठा प्रभाव भोसले,पेशवे, शिंदे, होळकर,निंबाळकर,गायकवाड, धार देवास आदींवर असल्याचे दिसते. काशिनाथ बुवा यांचा उल्लेख गायक म्हणून येतो तर रामचंद्रबाबा (२रे) यांचा उल्लेख कीर्तनकार व गायक म्हणून येतो. सद्यपरिस्थितीत योगिराज महाराज गोसावी ( योगिराज पैठणकर ) यांचे नाव नाथांचे १४ वे वंशज म्हणून संप्रदायात अग्रक्रमाने घेतले जाते.
एकनाथांचे कार्य व लेखन
- एकनाथी भागवत : भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर ओवीबद्ध मराठी टीका
- भावार्थ रामायण (४० हजार ओव्या) हिंदीसह अनेक भाषांत भाषांतरे)
- भावार्थ रामायण : (एकनाथी ओवीबद्ध मराठी, रॉयल ऑक्टेव्ह साईज - निर्णयसागर शताब्दि प्रकाशन. (मूळ - एकनाथ महाराज/संपादक - शं.भा. देवस्थळी, कृ.वि. सोमण)
- एकनाथी अभंग गाथा
- चिरंजीवपद
- रुक्मिणीस्वयंवर
- शुकाष्टक टीका
- स्वात्मबोध
- आनंदलहरी
- हस्तमालक टीका
- चतुःश्लोकी भागवत
- मुद्राविलास
- लघुगीता
- अनुभवानंद
- ब्रिदावळी
- संत एकनाथमहाराज कृत हरिपाठ - एकूण २५ अभंग
- समाजाच्या जागृतीसाठी अभंग, गवळणी व भारुडे यांची रचना.
- ज्ञानेश्वरीच्या उपलब्ध प्रतींचे शुद्धीकरण (ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर जवळजवळ २५० वर्षांनंतर) ज्ञानेश्वरीच्या शुद्धीकरणाचे काम त्यांनी शके १५०६ मध्ये पूर्ण केले.
- संत ज्ञानेश्वरांच्या आळंदी येथील समाधिस्थळाचा शोध व ज्ञानेश्वरांच्या समाधीचं जिर्णीद्धार केला. तसेच त्याचा मूळ गाभारा बांधून काढला.
- ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात नित्य पूजेची व्यवस्था लावून आळंदीची समाधी सोहळ्याची कार्तिकी यात्रा पुन्हा सुरू केली.
एकनाथांवरील मराठी पुस्तके
- संत एकनाथ (बालवाङ्मय, रवींद्र भट)
- संत एकनाथ (विजय यंगलवार)
- संत एकनाथ (विनायक मुरकुटे)
- श्री एकनाथ : परंपरा आणि प्रभाव (डॉ. रत्नाकर बापूराव मंचरकर)
- संतश्रेष्ठ एकनाथ (दीपक भागवत)
- एकनाथ गाथा (संपादक - साखरे महाराज (नानामाहाराज साखरे))
- एकनाथ चरित्र (ल.रा. पांगारकर)
- संत एकनाथ दर्शन (ललित लेखसंग्रह, लेखक -हे.वि. इनामदार)
- संत एकनाथांचा धर्मविचार (डॉ. सुरेखा आडगावकर)
- एकनाथांची निवडक भारुडे (डॉ. वसंत जोशी)
- एकनाथी भागवत सार्थ (सदाशिव आठवले)
- एकनाथी भागवत (शोधून, विपुल व सुबोध टीपा आणि अल्पचरित्र यांसह लिहिलेला ग्रंथ, लेखक/संपादक गोविंद नारायण शास्त्री दातार)
- एकनाथी भागवताचा अभ्यास (दा.वि. कुलकर्णी)
- एका जनार्दनी (एकनाथांवरील दीर्घ कादंबरी, लेखक - अशोक देशपांडे)
- एका जनार्दनी (डॉ. कल्याणी नामजोशी, डॉ. वि.रा. करंदीकर
- एका जनार्दनी ! (कादंबरी, लेखक - रवींद्र भट
- एका जनार्दनी (बालसाहित्य, लेखिका - लीला गोळे)
- एकोबा (एकनाथांचे चरित्र, लेखिला - डॉ. कुमुद गोसावी)
- भागवतोत्तम संत एकनाथ (डाॅ. शं. दा. पेंडसे)
- लोकनाथ (कादंबरी, लेखक - राजीव पुरुषोत्तम पटेल)
- शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे ओवीबद्ध चरित्र (कवी - केशव, संपादक- योगिराज पैठणकर)
- श्री एकनाथ चरितं (संत एकनाथ महाराज संस्कृत चरित्र,भाषांतरकार- श्रीमती नलिनी पाटील, संपादक - योगिराज पैठणकर)
- Sant Eknath Maharaj Charitra ( Translated By Pro. Mr. Vijaykumar Patil, Editor - Shri Yogiraj Maharaj Gosavi)
हे सुद्धा पहा
संदर्भ
बाह्य दुवे
- एकनाथ महाराज Archived 2013-06-14 at the Wayback Machine.
- एकनाथांची ’आठवणीतली गाणी’ या संकेतस्थळावरची गीते
- एकनाथी भागवत
- [permanent dead link]
This information is sourced from Wikipedia, the leading online open-content collaborative (crowd-sourced) encyclopedia. Wikipedia and/or TransLiteral Foundations can not guarantee the validaity of content above and can not be held responsible for inaccuracies or libelious information within. Please see Wikipedia General Disclaimer.
- [S25]
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
भावे म. सा. आ. ४, पू.--२५--८२
एकनाथ ज. १५४८- गिरिजाबाई, जनार्दन स्वामीचा गुरुपदेश १५५८ व ज्ञानेश्वरी
व अमृतानुभव यांचे अध्ययन. गुरुच्या आज्ञेनें ग्रंथनिष्पत्ति मृ. स. १५९९
(श. १५२१ फाल्गुन व.६) श्रीमद्भागवत, ज्ञानेश्वरीचें संस्करण वरगैरे ग्रंथसमृद्धि
महाराष्ट्र भाषेंत. ज्ञानेश्वरानंतर मुसलमानांचा फारशी भाषेचा प्रभाव मराठीवर
कसा झाला हैं एकनाथाच्या कृतींत व्यक्त होतें. अजंदास्त पहा.
- [S26]
Comments | अभिप्राय
Comments written here will be public after appropriate moderation.Like us on Facebook to send us a private message.