आंगरे, बाबूराव[1, 2]

-
Name आंगरे, बाबूराव Nickname मामासाहेब Gender Male Died 1 SEPT 1813 Person ID I549 Maratha Empire Last Modified 7 Apr 2022
Father आंगरे, येसाजी Family ID F329 Group Sheet | Family Chart
Children + 1. आंगरे, संभाजी, d. 1846 [Adopted] Last Modified 7 Apr 2022 Family ID F335 Group Sheet | Family Chart
-
Sources
- [S25]
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
बाबूराव आंगरे मामासाहेब, दौलतराव सिद्याचा मामा मरेपर्यंत हा सिद्याचे कारभारांत होता. ब्राउटनच्या पत्रांत त्याची हकीकत भरपूर आहे.
(Brouchton pp. 82, l53, 199, 210.)
- [S26]
केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/392-2012-10-07-08-50-56.
मानाजी दुसरा व बाबुराव - रघूजीच्या निधनानंतर जयसिंग आंगरे हा रघूजीच्या मानाजी नांवाच्या अल्पवयी मुलांचें पालकत्व स्वीकारून कुलाब्याचा कारभार पाहूं लागला. जयसिंगानें ही गोष्ट पुणें दरबारास न विचारतां केली असल्यामुळें मानाजी व जयसिंग हे दोघेहि कारमारीमंडळाच्या रोषास पात्र झाले. पण सवाई माधवराव पुढें लवकरच मरण पावल्यामुळें बाजीरावास गादी मिळून कारभारी मंडलाची सत्ता संपुष्टांत आली असें दिसतें कीं या वेळच्या कारस्थानांत मानाजीचा पक्ष पेशव्यांनीं घेतल्यामुळें प्रतिपक्षी जयसिंग यानें शिंद्याच्या दरबारीं मदत मिळविण्याविषयी बोलणें लावलें. शिंद्याकडील सरदार बाबूराव हा अलीबागेस आला; पण अखेर त्यानें उभय पक्षांच्या हक्कदारांनां कैदेंत टाकून स्वतःच अलीबाग बळकाविली. बाबूराव हा आंगरे घराण्यांतील पुरुष असून तो दौलतराव शिंद्याचा मामा होता (वैशावळी पहा).
१८१३ सालीं बाबूराव जांबगांव येथें मृत्यु पावल्यावर मानाजीस आपलें डोकें वर काढतां आलें व पेशव्यांस १० हजारांचा मुलुख व खांदेरी बेट देऊन त्यानें अलीबाग परत मिळविली. मानाजी हा १८१७ सालीं वारला. या दोन पिढयांतल्या भांडणामुळें अत्यंत नुकसान होऊन आंगऱ्यांची तीस पसतीस लक्षांची दौलत तीन लक्षांवर आली.
- [S25]
Comments | अभिप्राय
Comments written here will be public after appropriate moderation.Like us on Facebook to send us a private message.