आंगरे, सेखोजी[1, 2]

-
Name आंगरे, सेखोजी Nickname आंग्रे Gender Male Died 27 Aug 1733 Person ID I514 Maratha Empire Last Modified 3 Apr 2022
Father आंगरे, कान्होजी, b. 1669, d. 3 Jul 1729 (Age 60 years) Mother आंगरे, मथुराबाई Family ID F313 Group Sheet | Family Chart
-
Sources
- [S25]
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
कान्होजीचा पुत्र सेखोजी पराक्रमी व समंजस होता, पण तरुणपणींच मृत्यु पावल्याने मराठी आरमाराची अधोगति सुरु झाली. त्याच्या संततीचा उल्लेख नाहीं.
- [S26]
केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-52/10994-2013-03-06-08-15-18.
सेखोजी आंगरे— सेखोजी हा कान्होजीची स्त्री मथुराबाई हिचा वडील मुलगा. सन १७२९ त कान्होजी मरण पावल्यावर सेखोजी सरखेलीचा कारभार पाहूं लागला तो राजनिष्ठ व इमानी सेवक असून हवशांचें प्राबल्य मोडून मराठी राज्याच्या अभिवृद्धीसाठी मनापासून झटणारा होता. शौर्य, कर्तृत्वाची आवड, भारदस्तपणा व शालीनता हे गुण सेखोजीच्या अंगीं विशेष होते. त्याची आई मथुराबाई ही कर्तृत्ववान व मराठी राज्याची अभिमानी होती.
कान्होजीच्या पश्चात् हबशांनीं कोंकणांत बराच उपसर्ग मांडिला. तथापि सेखोजीच्या शहाणपणानें हबशांचें विशेष कांहीं चाललें नाहीं. ता. १ मे स. १७३३ रोजी मानाजी आरमार घेऊन जंजिर्यावर आला व त्यानें सिद्दीच्या आरमाराचा पाडाव केला. १७३३ च्या जंजिर्यावरील मोहिमेंत जूनच्या अखेरीपावेतों मुंबईजवळचा थळचा मोठा किल्ला व पेणनदीमधील रावळीचा किल्ला सेखोजी आंगर्यानें सीद्दीपासून सर केला, त्यामुळें मुंबईस इंग्रजांस मोठी धास्ती पडली. पोर्तुगीज लोक हबशांस मदत करीत, सबब त्यांचा चौल शहराचा भाग आंगर्यानें हस्तगत करण्याचा प्रयत्न चालविला. इंग्रजांचें 'रोझ' नांवाचें जहाज त्यानें पाडाव केलें होतें, तें ७६०३ रुपये दंड घेऊन आंगर्यानें इंग्रजांस परत दिलें.
हबशी नाहींसा झाल्यास आंगर्याचा जोर वाढून आपला निभाव लागणार नाहीं अशी इंग्रजांस धास्ती पडल्यामुळें ते हबशास फौज, दारूगोळा, अन्नसामुग्री वगैरेंचा पुरवठा करीत होते. तें पाहून सेखोजीनें मुंबईवर स्वारी करण्याची तयारी केली, परंतु पर्जन्यकाळ असल्यामुळें त्याचा इलाज चालला नाहीं. इंग्रजांस शह देण्याकरितां आंगर्यानें उंदेरीवर हल्ला चढविला. उंदेरी किल्ला हबशाच्या कबजांत होता त्या प्रसंगीं हबशास मदत करण्याकरितां इंग्रजांनीं टॉमस होल्डन यास 'मेरी' नांवाचें लढाऊ जहाज व सर्व साहित्य देऊन रवाना केलें. परंतु इंग्रजांचा समाचार घेण्यास सेखोजी फार दिवस जगला नाहीं. तो लवकरच पुढें सप्टेंबर महिन्यांत एकाएकीं मरण पावला. बाजीराव, संभाजी आंगरे वगैरे सर्वांशीं सेखोजींचें वर्तन गोड व अष्टपैलू होतें. कुटुंबातील सर्व बायामाणसांशीं त्याचें प्रेम सलोखा असे. शिवाय 'आंगरे' पहा.
- [S25]
Comments | अभिप्राय
Comments written here will be public after appropriate moderation.Like us on Facebook to send us a private message.