कोल्हटकर, कोन्हेरराम[1, 2, 3]

-
Name कोल्हटकर, कोन्हेरराम Gender Male Association उपाध्ये, दादंभट (Relationship: कोन्हेरराम कोल्हटकरानें यास नागपुरचें उपाध्येपण देवविलें.) Person ID I478 Maratha Empire Last Modified 20 Apr 2022
Father कोल्हटकर, रामाजीपंत नारायण Family ID F299 Group Sheet | Family Chart
-
Sources
- [S44]
नागपूर राज्याचे पराक्रमी संस्थापकः पहिले रघुजी , शरद कोलारकर , https://bahuvidh.com/punashcha/23106., https://bahuvidh.com/punashcha/23106 .
रघुजीच्या बालपणाबद्दल हकिकत फारशी उपलब्ध नाही. त्याची आई काशीबाई व आजी बदाबाई यांना रघुजीबद्दल फार काळजी वाटत होती. कारण रघुजीचे वडील बिंबाजी रघुजीच्या जन्मानंतर लवकरच मरण पावले. लहानपणी रघुजी पांडववाडीत राहात होता. पांडववाडी (वाईजवळ) येते रामाजीपंत कोल्हटकर म्हणून एक रामभक्त राहात होता. त्यांच्या वरदानाने रघुजीचा जन्म झाला असे त्याचे आईबाप मानीत. रामाजीपंताचे पुत्र कोन्हेरराम व भास्करराम ह्यांच्या संबंधामुळेच रघुजी नागपुरात आले. थोडा मोठा झाल्यानंतर रघुजी आपली काकू रामाऊ (साबाजीची बायको) हिजपाशी राहत असे. तला मूलबाळ नसल्यामुळे तिलाही त्याचा लळा लागला. रघुजी थोडा मोठा झाल्यानंतर त्यास २८ जून १७२२ रोजी शिवाजी करांडे यांच्या हाताखाली राणोजी बोसले यांच्या सैन्यात ठेवण्यात आले.
- [S25]
ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
- [S26]
केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-41-48/6311-2013-01-30-06-26-04.
कोन्हे राम कोल्हटकर- रत्नागिरीजवळील नेवरे गावी रामजी नारायण कोल्हटकर हे रहात असत. पेशवाईत त्यांनी वाईजवळ पांडवगड येथे वतन संपादिले. पांडवगडाहून नेवर्यास जाण्याची वाट कोयना काठाने दक्षिणेस भैरवगडावरून चिपळुणाकडे जाते. भैरवगडाखाली बापूजी, साबाजी व परसोजी हे भोसलेबंधू राहात असत. त्यांचा व रामाजीपंतांचा परिचय झाला होता. एकदा हबशाने भैरवगडावर स्वरी करून भोसल्यांना कुटुंबासुद्धा पकडून जंजिर्यावर कैदेत ठेवले. त्यावेळी ३ हजार रु. दंड भरून पंतांनी यांची सुटका केली. त्यामुळे भोसल्यांनी आपले उपाध्येपण पंतांस वंशपरंपरा करून दिले. पंतांचा प्रवेश शाहूछत्रपतीकडेही होता; त्यांच्यामार्फत भोसलेबंधू छत्रपतीकडे आले. छत्रपतींचे वाकनीस ठोसर यांची मुलगी शाहुमहाराजांनी वाढविलेली होती. त्यांनी तिचे लग्न पंतांचा मुलगा कोन्हेर याच्याशी लाविले. त्या कारणाने कोन्हेरवर महाराजांचा लोभ विशेष जडला. त्याला भास्करराव म्हणून एक भाऊ होता. रघुजी भोसल्यास महाराजांनी सेनासाहेबसुभापद दिल्यावर त्याची मुजुमदारी कोन्हेरपंतांस दिली. कोन्हेरपंताने कान्होजी भोसल्यास वर्हाडांतून पकडून सातार्यास आणले होते. छत्रपतींनी भास्करपंतांस रघुजीची बक्षीगिरी दिली. या दोघा बंधूंच्या मदतीने रघुजीने पुढे बंगालपावेतो प्रदेश काबीज करून अनेक पराक्रम गाजविले. भोसल्यांचे राज्य असेंपर्यंत नागपुरास कोल्हटकरांचा लौकिक होता. कोल्हटकर व पेशवे यांचे मात्र चांगले नसे. ते उभयतां सर्वस्वी पेशव्यांच्या विरुद्ध राहून रघुजीस मदत करीत. मराठेशाहीत दुही माजविणार्या ज्या काही व्यक्ती झाल्या त्यात रघुजी भोसले हे एक प्रमुख होते. इ.स. १७४६ त कर्नाटकच्या सुभेदारीच्या भानगडीत भोसले हे बाबूजी नाईकांच्या बाजूचे होते व कोन्हेरपंत हा सातार्यास राहून त्या बाबतीत खटपट करीत होता. कोन्हेरपंत याने भोसल्यांच्या घरच्या भाऊबंदकीतही भाग घेतला होता. भास्करपंत हा बंगल्यावर स्वार्या करी. तिकडे त्याला अलीवर्दीखानाने दगा देऊन मारले असता (भास्कर राम कोल्हटकर पहा) कोन्हेरपंतांस दु:ख होऊन त्यानें देशी जाण्याचा हट्ट घेतला. तेव्हा भोसल्यांनी त्यांना दरसाल २५ हजारांची जहागीर देऊन खेरीज लग्नकार्य व स्वारीशिकारीस सरकारी मदत देण्याचे शपथपूर्वक कबूल केले. याशिवाय कर्नाटकातील भोसल्यांच्या सुभ्याबद्दल कोन्हेरपंतांस १० लक्षांचे उत्पन्न अर्काटच्या नबाबाने इ.स. १७४८ त करार करून दिले होतेच. तरीही पंतांची उधासीनता दूर झाली नाही. तेव्हा रघुजीने कष्टाने त्यांना निरोप दिला. पंतांना सहा पुत्र होते. त्यापैकी चौघांना रघुजीने सरंजाम करून दिला व बापूराव कोन्हेर याला मुख्य करून जवळ ठेवले (१७५२).रघुजीची मर्जी पंतांवर फार होती. त्याने त्यांना एका स्वदस्तूरच्या पत्रात लिहिले आहे की, ``आमचाही वृद्धापकाळ व तुमचाही वृद्धापकाळ, अशा प्रसंगी तुम्ही व आम्ही विभक्त असावे हे ईश्वरास मानत नाही... हे पत्र लक्ष पत्रांचे जागा मानून तुम्ही चि. बाबूरायास घेऊन यावे. ...तुम्ही यावयास अनमान कराल, तर तुम्हाला आमच्या गळ्याची आण असें.'' सारांश, भोसले व कोल्हटकर या कुटुंबाचा घरोबा एकजीवी होता. हिंदुस्थानच्या ईशान्येकडील मराठेशाहीची प्रचंड दौलत उभारण्यांत या दोन कुटुंबांचे श्रमच कारणीभूत झाले होते. पुढे या दोघांची भेट झाली की नाही हे आढळत नाही. भोसल्यांमुळे कोल्हटकरांचे व पेशव्यांचे सूत चांगले नव्हते. रघुजी व कोन्हेरपंत मेल्यावर नानासाहेब पेशव्यांनी भोसल्यांच्या भाऊबंदकीत हात घालून ती मिटविली व त्याच वेळी कोल्हटकरांच्या घराण्यास दूर करून देवाजीपंत चोरघड्यास भोसल्यांचा कारभारी नेमले. कोल्हटकरांच्या घराण्यातील पुरुष होतकरू व पराक्रमी होते. त्यांची भोसल्यांच्या दौलतीविषयी निष्ठा असून तिच्यासाठी ते सर्वस्वावर पाणी सोडण्यास तयार असत. पण पुढे देवाजीपंताने सर्व कारभार हळूहळू ताब्यात घेतला व कोल्हटकर कुटुंब जे मागे पडले ते कायमचेच. कोन्हेरपंतांस सहा पुत्र बाबूराव, यशवंत, रामचंद्र, बळवंत, गोविंद आणि लक्ष्मण या नावाचे होते. पैकी बाबूरावाकडे मुख्य वडिलकीचा सरंजाम पुढे चालला. (ना.भो.का. २; इ.स. ऐ. गो. पु. २. राज. खं. ३; इति. भंड. अह. १८३५; मरा. रि.या.)
- [S44]
Comments | अभिप्राय
Comments written here will be public after appropriate moderation.Like us on Facebook to send us a private message.