भट, आनंदीबाई[1, 2, 3, 4, 5]

Female - 1794


Personal Information    |    Sources    |    All

  • Name भट, आनंदीबाई 
    Gender Female 
    Died 27 Mar 1794  Anandvalli, Maharashtra Find all individuals with events at this location 
    Person ID I470  Maratha Empire
    Last Modified 29 Mar 2022 

    Father ओक, राघो महादेव 
    Mother ओक, काकूबाई 
    Family ID F294  Group Sheet  |  Family Chart

  • Sources

    1. [S25]
      ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).


    2. [S26]
      केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-40-02/488-2012-10-07-13-05-52.
      आनंदीबाई (पेशवे) - राघोबादादा उर्फ रघुनाथराव पेशवे यांचें सुप्रसिद्ध द्वितीय कुटुंब. ही राघो महादेव ओक मळणकर यांची कन्या असून हिंचे लग्न तारीख १७ डिसेंबर १७५५ रोजीं कृष्णातीरीं गलगलें येथें स्वारींत झालें. ही मराठयांच्या इतिहासांत कारस्थानी स्त्री म्हणून प्रसिद्ध आहे. तिचें राघोबावर बरेंच वजन असून तो राजकारणांतहि तिच्या सल्ल्याप्रमाणें चालत होता असें दिसतें. थोरला माधवराव मरण पावल्यावर सातारच्या महाराजपासून नारायणरावाकरितां पेशवाईचीं वस्त्रें आणण्यास नारायणरावाबरोबर जातेवेळीं राघोबादादा पंचवीस लक्षांच्या सरंजामाकरितां अडून बसला होता पण आनंदीबाईनें 'संरजाम घेण्याऐवजी नारायणराव म्हणतो त्याप्रमाणें स्वतःच वडीलपणानें कारभार करावा' असा राघोबास सल्ला दिल्यावरून तो हट्ट सोडून नारायणरावाबरोबर गेला (ऐ.ले.सं.ग भाग ४. पृ. १९६८). तथापि आनंदीबाई मोठी कारस्थानी स्त्री आहे असा नारायणरावाचा पक्का ग्रह झालेला असून तिच्या हालचालीवर त्यांनें करडी नजर ठेविली होती असें दिसतें. नागपूरकर भोंसल्यांच्या बखरींत (पृ.९३) तर असें म्हटलें आहे कीं, 'नारायणरावानें तिची लुगडयांत फंदाचे कागद लपविलें म्हणून लुगडे फेडून छळणा करावी.' नारायणरावाचा वध 'ध' चा 'मा' करून हिनेंच केला असा तत्कालीनांचा दृढ समज होता असें पांडुरंग नामक कवीचें नारायणरावाच्या वधावरील काव्य इतिहाससंग्रहांत (मार्च १९१०) प्रसिद्ध झालें आहे त्यावरून स्पष्ट होतें. आपल्यावरील हा आरोप स्वतः आनंदीबाईहि जाणून होती असें इतिहासंग्रहांत छापलेल्या (पु.६, अं. ४, ५, ६) मेणवली दफ्तरांतील एका पत्रावरून कळतें. तथापि त्याच पत्रावरून नाना फडणीस आदिकरून मंडळीस तिच्या अपराधाचें माप तिच्या पदरांत घालण्याइतका स्पष्ट पुरावा मिळाल नव्हता अशीहि शंका उत्पन्न होते. राघोबादादाचें अस्सल पत्र रामशास्त्र्यांच्या हातीं पडलें (ग्रांटडफ) त्यावरून 'ध' चा 'मा' झाला होता हें जरी सिद्ध झाले असलें तरी तो कोणीं केला हें त्यास गूढच राहिलें असावें.

      नाना फडणिसानें तुळ्या पवाराची जबानी घेतली तींतहि आनंदीबाईंचें नांव पुढें आलें नव्हतें (इ.स. वर्ष १ अं. ९). नारायणरावाच्या वधानंतर गंगाबाई सती जाऊं लागली तेव्हां आनंदबीईनें 'जातीस कुठें तुझी पाळी चुकली आहे' असे म्हटले असल्याचा हरिवंशाच्या बखरींत (कलम ७३) उल्लेख आहे. पण ज्या आनंदीबाईंने गंगाबाई गरोदर आहे असें जाणूनहि तिच्या सहगमनास हरकत केली तीच पुढें गंगाबाईचा गर्भपात करण्याचा प्रयत्न करीत आहे अशी नाना फडणिसा व्या पक्षाच्या मंडळीस शंका येऊं लागली. ही शंका परशुरामभाऊनें वामरावास लिहिलेल्या एका पत्रांत व्यक्त केलेली सांपडते ( अधिकारयोग प्र.१०). बारभाईनी कारस्थान करून राघोबादादाविरुद्ध कट केला तरी आनंदीबाईची नाना फडणीस व सखारामबापू यांस साळसूदपणें पत्रें जात होतींच १७७४ च्या एप्रिलांत बऱ्हाणपूर मुक्कामाहून आनंदीबाईंनें नानास जें पत्र लिहिलें त्यांत तर 'पुरंदरची सर्द हवा लेकरास मानवणार नाही' अशी सवाई माधवरावाबद्दल काळजी व्यक्त केली आहे. आनंदीबाई गरोदर असल्यामुळें १७७५ मध्यें राघोबादाद तीस मागें धार येथें ठेवून इंग्रजांची कुमक घेण्यास गेला तेव्हां हि आनंदीबाईचें राघोबादादाच्या राजकारणांत लक्ष होतेंच १७७५ च्या फेब्रुवारीत लिहिलेल्या एका पत्रांत तिनें फितुरी लोकांबद्दल काळजी घेण्याविषयीं सखाराम हरि वगैरे मंडळीस बजावलें आहे. त्याचप्रमाणें पुढें चार महिन्यांनी सखाराम हरि तिच्या नवऱ्याप्रीत्यर्थ लढतांना जखमी झाला तेव्हा त्यास तिनें ममतापूर्वक उत्तेजनपर लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे (इ.सं. पु.१, अं.१२). पुढें १७७५ मध्यें आनंदीबाईस धारच्या किल्ल्यांतच अटकेंत ठेवण्यांत आलें. येथून इ.स. १७७८ च्या सपटंबर महिन्यांत तिनें नानाफडणिसास लिहिलेल्या पत्रांतील ''हल्लीं यवनाक्रांत ब्राह्मणी दौलत फितुरांनीं होऊं पाहते. तुमच्या चित्तांतील उगीच आटी जात नाहीं....आम्ही येथे तुमच्या स्वाधीन. पावणेदोन वर्षे जाहाली. कार्यसिद्धि तुमची कांहींच न जाहाली. नुकसान पांच हजार फौजेचें, सरंजामी गुंतलें, ही झाली. विशेष कांहींच न झालें. तुमची फौज गुंतून आमचा धन्याचे पायासीं वियोग.'' या वाक्यावरून तिचा मुत्सुद्दीपणा चांगला ध्यानांत येतो (इ.सं.पु.१, अंक ४). आनंदीबाईच्या पत्रांत खोंचदारपणाहि बराच आढळतो. त्याच दिवशीं लिहिलेल्या सखाराम भगवंताच्या पत्रांत ती नाना फडणिसाच्या नवीन लग्नास उद्देशून लिहितें. ''नवी भाजवय लाडकी केली तिचें नांव काय ठेविलें व दुसरी करावयाची कधी?'' तथापि वरील उपरोधिक वाक्यें लिहिणाऱ्या स्वत: आनंदीबाईच्याच यजमानांनी सुरतेस येऊन राहिल्यावर तिच्या जिवंतपणींच भिकाजीपंत पेंडशांच्या मथुराबाई नामक कन्यंशीं लग्न केलें होतें हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. पुढें इंग्रजांशीं तह होऊन राघोबादादा मराठ्यांकडे आला. तथापि बाजीरावास पेशवाई प्राप्त होईपर्यंत आनंदीबाईस स्वांतत्र्य प्राप्त झालें नाहीं. राघोबादादाच्या मृत्यूपर्येंत ती त्याजबरोबर कोंपरगावास नाना फडणिसाच्या प्रतिबंधांत होती. कारभारी मंडळीतें तिच्याशीं वर्तन एकंदरींत बरेच निष्ठुरपणाचें होतेंसें दिसतें. काव्येतिहास-संग्रहांतील (पृ. ४९६) एका पत्रांत राघोबादादा मृत्यु पावल्यावर आनंदीबाईच्या अंगावरील सौभाग्यालंकार काढून आणण्यास नानानें ताबडतोब आपला हस्तक कोंपरगावीं पाठविला होता असा उल्लेख आहे. आनंदीबाईस शके १७१५ प्रमादी सवंत्सर फाल्गुन वद्य ११ स(भा.इ.सं.मं.वार्षिक इतिवृत शके १८३५ धडफळे यादी) म्हणजे ता. २७ मार्च १७९४ रोंजी आनंदवल्ली येथें देवाज्ञा झाली. तीस दुर्गाबाई उर्फ गोदूबाई नांवाची कन्या (महाराष्ट्रंसाहित्यपत्रिका, वर्ष ८, पृ. १५९ पहा) आणि बाजीराव व चिमणाजीअप्पा असे दोन पुत्र होतें.


    3. [S41]
      WIKI.MR.आनंदीबाई_भट, Wikipedia, (Wikipedia), https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AD%E0%A4%9.

      आनंदीबाई भट (माहेरच्या आनंदीबाई ओक) या रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा पेशव्यांच्या पत्‍नी होत.

      आनंदीबाई यांचे माहेर हे ओकांचे. हे ओक घराणे गुहागरजवळील मळण गावातील होय. हे गाव गुहागर पासून २० किमी अंतरावर आहे. मुळात सर्व ओक हे गुहागरजवळ असणाऱ्या पालशेत गावचे. पुढे एका कुटुंबाला पालशेत गावची देशमुखी मिळाली आणि सरंजाम म्हणून आठ गावे दिली गेली, त्यात मळण हे गाव होते. पालशेत येथून या आठ गावात ओकांची कुटुंबे गेली. राघो महादेव हे आनंदीबाई यांचे वडील. राघो महादेव हे कारकून, शिलेदार होते त्यामुळे बहुतांश वेळा ते घाटावर असत.

      आनंदीबाई यांनी पुढे आपल्या दत्तक भावासाठी, बाबुराव याच्यासाठी, काही इनाम मिळवून दिले. ते इनाम अगदी इनाम कमिशनपर्यंत चालू होते. पुढे इंग्रजांच्या आमदानीत त्यांना पेन्शन मिळू लागले. बाबुराव ओक यांची मुले पुढे बरीच भांडकुदळ निघाली. यामुळे घराण्याचे फार नुकसान झाले. या या बापूंचा मोठा चिरंजीव माधवराव ओक हे सन १९१४ पर्यंत हयात होते. माधवरावांचा मुलगा विनायकराव हा पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चित्रकला शिकवत असे. तो सन १९११ मध्ये वारला.त्यांना दोन मुले. पैकी विश्वनाथ विनायकराव हे मुंबईत वकील होते. बापूराव ओक यांची आई म्हणजे काकूबाई ओक अर्थात आनंदीबाई पेशवे यांची आई. त्यांना सालिना ५००० रुपये मिळत असत.

      आनंदीबाईंची दिनचर्या

      पेशवे दप्तरातील कागदपत्रे या गो.स. सरदेसाई यांनी निवडलेल्या मोडी कागदपत्रांच्या एक खंडात आनंदीबाई यांच्याबद्दलची अनेक कागदपत्रे छापली आहेत. ‘आनंदीबाई यांची दिनचर्या’ अशा नावाने तो अध्याय आहे.

      राजकारणी आनंदीबाई

      शंभर राजकारणे करतील असा आनंदीबाईंचा लौकिक होता.[ संदर्भ हवा ] त्यांनी रघुनाथरावांनी गारद्यांना लिहिलेल्या नारायणरावाला धरावे अशी आज्ञा असलेल्या पत्रात बदल करून धचा मा केला आणि नारायणाचा खून घडवून आणला, अशी त्यांची प्रसिद्धी आहे. आनंदीबाई कोपरगावला बंदिस्त असताना त्यांनी दिनचर्या लिहून ठेवली आहे, तीवरून आनंदीबाईंच्या स्वभावाचे यथार्थ दर्शन घडण्यास मदत होते. त्यांच्या दिनचर्येवरून त्यांच्या अंतःकरणाची ऋजुता आणि मनाचा कणखरपणा दिसून येतो. नाना फडणविसांनी लादलेल्या जाचास कंटाळून लिहिलेल्या पत्रांत त्या आपला राग व्यक्त करताना रामायण-महाभारतातील दृष्टान्त व दाखले देतात, यावरून त्यांचा वाचनाचा व्यासंग चांगला असल्याचे कळते. वाचनात जशा त्या प्रवीण होत्या तशा लिहिण्यातही हुशार होत्या हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांवरून समजते. महत्त्वाची पत्रे त्या स्वतः लिहीत असत.

      आपले पुत्र दुसरे बाजीराव यांचा आचरटपणा आनंदीबाईंना पसंत नव्हता. त्यांनी लिहिले आहे, ’बाजीराव थोर झाले असता अद्याप मर्यादेची तऱ्हा नाही’.

      नाना फडणविसांना पाठविलेल्या एका पत्रात त्यांनी नानांची कान‍उघाडणी केली आहे. ते पत्र असे :-
      'आम्ही होऊन (पत्र) पाठवावे, तर कारणाखेरीज आम्हास पत्र पाठवितात म्हणौन तुम्हीच हसाल, हा काळ समजोन पत्रे न पाठविली. हल्ली पत्राचे कारण की तुम्ही तीन पिढ्यांचे दौलतीतील फडणीस असौन दौलताची तो गती जाली ती जाली. हल्ली यवनाक्रांत ब्राह्मणी दौलत फितुरांनी होऊ पाहते. तुमच्या चित्तातील उगीच अढी जात नाही, आणि ब्राह्मणी तो बुडत चालली! या दौलतेत पूर्वी कारभारी जाले, त्यांनी ब्राह्मणी स्थापली व दौलतेची वृद्धी केली हा काळ प्रस्तुत श्रीसत्तेने आला! इंग्रज बुंदेलखंडापर्यंत दोन कंपू आले, आणिकही मागून येणार. या बारीक मोठा विचार जो करणे तो तुम्हीच करणे.. त्यापक्षी दोन्ही गोष्टींचा आंदेशा करून ब्राह्मणपण राहे ते करणे.'

      बारभाईंचा कारभार बाईंना पसंत नव्हता. सखारामबापूंना यासंबंधी लिहिलेल्या एका पत्रात उपरोध आणि त्वेष भरला आहे. या पत्रात सखारामबापूंनी वृद्धापकाळी केलेल्या लग्नाबद्दल त्यांना टोमणा मारला आहे. ते पत्र असे :-
      'हे कालचक्र विपरीत आहे. परंतु आम्हास हाच भरवसा आहे की, तुम्ही कालचक्रासही फिरवाल, हे जाणून तुम्हांस पत्र लिहिले आहे. तरी ब्राह्मणी दौलत नीट राहून हुजूराचाही संतोष राहून सर्व गोष्टी बऱ्या होतील त्या कराव्या, न केल्या जन्मभर चांगले केले, आणि शेवटी म्हातारपणी इंग्रजांच्या घरात ब्राह्मणी दौलत घातली हे अपेश येई तो अर्थ न करावा.. सारांश हाच की इंग्रजांच्या हाती ब्राह्मण न चालता, दौलतीचा बंदोबस्त होऊन यावा. विशेष लिहावे तरी तुमचे दशांशही आम्हास समजत नाही. परंतु यश अपेश याचे धनी तुम्ही.. आम्ही लिहून विशेष तो नाही, तुम्ही मोजीतही नाही, परंतु आकार दिसत चालला, यास्तव सूचना लिहिली आहे.
      ‘नवी भावजय लाडकी केली तिचे नाव काय ठेवले व दुसरी करावयाची कधी हा मजकूर विशेष लिहिला होता त्याचे उत्तर काहीच आले नाही’.

      आनंदीबाईंबद्दलची पुस्तके

      This information is sourced from Wikipedia, the leading online open-content collaborative (crowd-sourced) encyclopedia. Wikipedia and/or TransLiteral Foundations can not guarantee the validaity of content above and can not be held responsible for inaccuracies or libelious information within. Please see Wikipedia General Disclaimer.



    4. [S42]
      Vikaspedia, (Vikaspedia), https://mr.vikaspedia.in/., https://mr.vikaspedia.in/education/apala-maharashtra/92e93993e93093e93794d91f94d930-91593f93294d932947/90692890292694092c93e90891a940-90692890292693593294d932940.
      वेशीवरच्या पाऊलखुणा : आनंदीबाईची आनंदवल्ली !

      आनंदवल्लीभोवती आनंदीबाईंचा पिंगा!

      एखाद्या नावाभवती अनेक वलये असतात ती तेथील ऐतिहासिक घटना व घडामोडींमुळे. ही वलये शेकडो वर्षांनंतरही आपल्या पाऊलखुणांतून अस्तित्वाची साक्ष देताना दिसतात. मात्र नाशिक शहराचे एक उपनगर झालेले आनंदवल्ली हे गाव लक्षात राहते ते आनंदीबाई पेशव्यांच्या मुत्सद्दी आठवणींमुळे. आनंदीबाईंच्या आठवणी अजूनही आनंदवल्लीभोवती पिंगा घालताना ‌दिसतात.

      कसे पोचाल ?
      आनंदवल्ली हे गाव नाशिकच्या पश्चिमेस चार किलोमीटरवर आहे. शहरातून गंगापूररोडने धरणाच्या दिशेने निघाले की, उजव्या हाताला मोठमोठाल्या इमारतींच्या गर्दीत आनंदवल्ली हरवल्याचे पहायला मिळते. हे गाव आता नाशिक शहराचे एक उपनगर होऊ पाहत असल्याने गावाच्या खाणाखुणा स्वत:लाच शोधत राहतात.

      आनंदवल्लीचा इतिहास
      गोदावरीचा रमणीय प्रवाह आनंदवल्लीला खेटून गेल्याने हा परिसर रमणीय वाटतो. पूर्वी आनंदवल्ली हे एक लहानसे खेडे होते. त्याचे पूर्वीचे नाव मौजे चावंडस किंवा चौंधस असे म्हटले जाई. रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा पेशवे हे इ.स. १७६४ मध्ये पुतणे थोरले माधवराव साहेब पेशवे यांच्यावर नाराज होऊन आनंदवल्लीत येऊन राहिले. दरम्यान, राघो महादेव ओक-मळणकर यांची कन्या आनंदीबाई यांचा राघोबादादा उर्फ रघुनाथराव पेशवे यांच्याशी विवाह झाला. त्या रघुनाथरावांच्या दुसऱ्या पत्नी. १७६४ च्या डिसेंबर महिन्यात केसो गोविंद यांची चावंडस येथील कारभारावर नेमणूक झाली. तेव्हापासून गावच्या विकासाला चालना मिळाली. तेव्हा चावंडसचे नाव ‘आनंदवल्ली’ असे नव्हते. केसो गोविंद यांना व्यवस्थ‌ति कारभार करता यावा यासाठी पन्नास स्वार व पन्नास ‌शिपाई देण्यात आल्याचा उल्लेख पेशव्यांच्या कागदपत्रात मिळतो. रघुनाथरावांनी चावंडस येथे पत्नी आनंदीबाई यांच्यासाठी मोठा तटबंदी वाडा बांधला. त्याला आनंदीबाईंची गढी असेही म्हटले जाऊ लागले. २ ऑगस्ट १७६४ रोजी आनंदीबाईंना विनायक हा प्रथम पुत्ररत्न झाल्याने त्या आनंदात त्यांनी गावाचे नाव बदलून ‘आनंदवल्ली’ असे ठेवले, असे म्हटले जाते. मात्र तान्ह्या विनायकाला हातात खेळवताना रघुनाथरावांच्या हातातून पडल्याने विनायकचा मृत्यू झाला, अशीही अख्यायिका सांगितली जाते. पण आनंदवल्ली म्हटले की, आठवण होते ते आनंदीबाई पेशव्यांची अन्‌ डोळ्यांसमोर येते ते ‘ध’ चा ‘मा’ करून केलेले कुटील कारस्थान. मराठ्यांच्या इतिहासात कारस्थानी स्त्री म्हणून आनंदीबाई प्रसिद्ध होत्या. त्यामुळे नारायणरावांनी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली होती. नागपूरकर भोसल्यांच्या बखरीत तर असे म्हटले आहे की, ‘नारायणरावाने तिची लुगड्यांत फंदाचे कागद लपविले म्हणून लुगडे फेडून छळणा करावी.’ ‘ध’ चा ‘मा’ करून नारायणरावाचा वध आनंदीबाईंनीच केल्याचा समज तेव्हा सर्वांना होता. आनंदीबाईही आपल्यावरील हा आरोप जाणून होती, असे इतिहाससंग्रहांत छापलेल्या मेणवली दफ्तरांतील एका पत्रावरून कळते. मात्र, नाना फडणीसांसारख्या मुत्सद्द्यालाही आनंदीबाईंना अपराधी ठरवावे इतके पुरावे मिळाले नाहीत. नारायणरावांबाबतचे राघोबादादांचे अस्सल पत्र रामशास्त्र्यांच्या हाती पडले त्यावरून ‘ध’ चा ‘मा’ झाला होता हे जरी स्पष्ट झाले असले तरी ते कोणी केले हे गूढ अजूनही उलगडलेले नाही. नाना फडणीसांनी हे गूढ उलगडण्यासाठी बरीच खटाटोप करूनही आनंदीबाईंचे नाव पुढे आले नाही. यावरूनही आनंदीबाईंचा मुत्सद्दीपणा दिसून येतो.

      रघुनाथराव पेशवे आनंदवल्ली येथे १७६५ पासून १७६८ पर्यंत राहिले व येथूनच त्यांनी आनंदीबाईंच्या सल्ल्याने पेशवाईची गादी घेण्याकरिता बरेच राजकारण केले. एकदा त्यांनी १५००० सैन्य जमवून धोडपपर्यंत चाल केली. परंतु थोरले माधवराव पेशवे यांनी धोडपवर स्वारी करून त्यांच्या सैन्याचा पराभव केला व त्यांना कैद करून पुण्यात नेले. पण १७६८ मध्ये पेशव्यांनी आनंदवल्ली रघुनाथदादांच्या हवाली केली. आनंदीबाईंनी १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात नवशा गणपती मंदिराची स्थापना केली. नवसाला पावणारा गणपती म्हणून हे मंदिर आजही ओळखले जाते. हे मंदिर आनंदीबाईंच्या गढीच्या पश्चिमेस असल्याने तेव्हा गढीवरून गणपतीचे दर्शन घेत असावेत. नवशा मंदिराशेजारी हसन सय्यद रांझेशाह शहीद यांचा दर्गा आहे. हसनबाबा नारोशंकरांचे सरदार असल्याचेही म्हटले जाते. मात्र याबाबत पुरेशी माहिती मिळत नाही.

      रघुनाथदादा व आनंदीबाई कटकारस्थाने करू लागल्याने त्यांना कोपरगावात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. राघोबादादांचा मृत्यू झाल्यावर आनंदीबाईंच्या अंगावरील सौभाग्यालंकार काढून आणण्यासाठी नाना फडणीसांनी आपला हस्तक कोपरगावी पाठविला होता. यावरून तत्कालीन राजकारणाची तीव्रता लक्षात येते. पुढे आनंदीबाईंच्या आजारपणात तिने नाना फडणीस यांच्याकडे आनंवल्लीस हवाबदल करण्यासाठी पाठवावे म्हणून लक्ष्मणभट उपाध्ये यांच्या मार्फत पुष्कळ खटपट केला. नाना फडणीस यांनी आनंदीबाईंच्या विनंतीस मान देऊन, तिला सर्व खटल्यासह १७९२ मध्ये कोपरगावाहून आनंदवल्ली येथे पाठविले. पुढे दोन वर्षांनी म्हणजे २७ मार्च १७९४ मध्ये आनंदीबाईंचा आनंदवल्ली येथे मृत्यू झाला. मृत्यूसमयीही माधवरावांचा हेर गढीत उपस्थित होता आणि त्याने माधवरावांना गढीवर घडणाऱ्या सर्व घडामोडी कळविल्याची पत्रे मिळतात. आनंदीबाईंच्या मृत्यूच्या वार्तेबाबतच्या पत्रात आनंदीबाईंच्या मृत्यूक्षणांचे वर्णनही करण्यात आले आहे. मृत्यूच्या क्षणापर्यंत आनंदीबाई ‘सावध’ असल्याचेही पत्रात उल्लेख आहेत. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर त्यांची व रघुनाथरावांची समाधी आनंदवल्ली बंधाऱ्याजवळ रामेश्वर मंदिरासमोर बांधण्यात आली आहे. रामेश्वर मंदिरही पेशवेकालीन आणि आकर्षक आहे. या मंदिराबाहेरील मंडपात असलेला संगमरवरी नंदी नंतरच्या काळात बसविण्यात आला आहे. मात्र मंदिरातील पिंडीशेजारीच नंदीची आकर्षक मूर्ती आहे. शंकराच्या मंदिरात नंदी मंदिराबाहेर दिसतो मात्र येथे अगदी पिंडीजवळ व शालिनतेने पिंडीकडे पाहत असलेला नंदी पाहायला मिळतो. हे वेगळेपण इतरत्र पाहायला मिळत नाही.

      आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर बाजीराव, चिमणाजीआपा ही दोन मुले व अमृतराव १७९५ पर्यंत आनंदवल्ली येथेच बंदीवासात होते. परंतु त्यांनी गुप्त राजकारणे सुरू केल्याने त्यांना नाना फडणीसांनी १७९५ मध्ये जुन्नरच्या किल्ल्यात नेऊन कैदेत ठेवले. आनंदीबाईंना दुर्गाबाई ऊर्फ गोदूबाई नावाची कन्याही होती. मात्र तिच्याबाबतही माहिती उपलब्ध होत नाही. आनंदीबाईंनंतर आनंदवल्लीचे सर्व वैभव व महत्त्व संपुष्टात आले. १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडव‌ली. त्यानंतर इंग्रजांनी आनंदीबाईंच्या गढीला आग लावल्याचेही म्हटले जाते. त्याचे उरले सुरले अवशेष आता जमीनदोस्त झाले असून गढीचे कोसळलेले दोन बुरूज आजही तग धरून उभे आहेत. पण नाशिककरांना आनंदीबाईंची गढी आठवते ती चार वर्षांपूर्वी गढीच्या जागेवरून झालेल्या वादादरम्यान गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षारक्षकामुळे. तेव्हा ही गढी एकदम प्रकाशात आली. मात्र आनंदीबाईंच्या आठवणी मात्र अजूनही आनंदवल्लीभवती पिंगा घालतात. आनंदीबाईंची आनंदवल्लीतील पेशवाई संपली असली तर नवश्या गणपती व रामेश्वर मंदिर हे पेशव्यांच्या कारकिर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे.

      लेखक : रमेश पडवळ


    5. [S43]
      WIKI.Anandibai, Wikipedia, (Wikipedia), https://en.wikipedia.org/wiki/Anandibai.

      Anandi-bai
      ''Peshwin''
      Born Guhagar, Maratha Empire
      Spouse Raghunathrao
      Issue Baji Rao II and 2 others
      House Oak (by birth)
      Bhat (by marriage)
      Father Raghu Mahadev Oak

      Anandibai was a Peshwa Queen and the wife of Raghunathrao, the 11th Peshwa of the Maratha Empire. In August 1773, she successfully plotted the death of her nephew, the 17-year-old Peshwa Narayanrao. Her husband was acting regent at the time and next in line for the throne, at the time of Narayanrao's death.

      Early life and marriage

      Anandibai was born into a Chitpavan Brahmin family belonging to Guhagar village in the Konkan region of what is now Maharashtra state. She was the daughter of Raghu Mahadev Oak.[1] Her cousin Gopikabai (of the Raste family), was the wife of Peshwa Balaji Bajirao. In December 1756, when Anandibai was yet a child, she was married to Raghunath Rao, younger brother of Balaji Baji Rao.[2] She was his second wife. Raghunathrao's first wife (Janaki Bai of the Barwe family) had died in August 1755.

      Both Balaji and Raghunath were the sons of Baji Rao I, Peshwa of the Maratha Empire. The position of Peshwa was an administrative appointment made by the Chhatrapati (King), and it was not actually hereditary. Indeed, Baji Rao I was only the second man from his family to be named Peshwa.

      Assassination of Narayanrao

      Shaniwar Wada - the place where the conspiracy of the assassination of Narayanrao unfolded

      After the death of Madhavrao I in 1772, his brother Narayanrao was to take the throne but he was still a minor. There was debate among the Peshwas about who should become the next regent. Finally it was decided that Narayanrao would be the peshwa with his uncle Raghunathrao acting as regent. Initially this arrangement worked but soon Narayanrao imprisoned his uncle on charges of plotting to overthrow him.

      On 30 August 1773 in Shaniwar Wada,[3] in an effort to free himself, Raghunathrao hired Gardis as mercenaries. These men scaled and captured Shaniwar Wada. They quickly reached Narayanrao's chambers and held him captive. Narayanrao tried to appeal to his uncle but Anandibai intervened and did not allow his requests to reach Raghunathrao.

      According to popular legend, Raghunathrao had sent a message to Sumer Singh Gardi to fetch Narayanrao using the Marathi word dharaa (धरा) or 'hold' (actual phrase in Marathi - " नारायणरावांना धरा"/"Narayanrao-ana dhara"). This message was intercepted by his wife Anandibai who changed a single letter to make it read as maaraa (मारा) or 'kill' . The miscommunication led the Gardis to chase Narayanrao, who, upon hearing them coming, started running towards his uncles' residence screaming, "Kaka! Mala Vachva!!" ("Uncle! Save me!"). But nobody came to help him and he was killed in the presence of his uncle.[3]

      Aftermath

      After Narayanrao's death, Raghunathrao became Peshwa but Nana Phadanvis ordered an investigation into the death of Narayanrao. The Chief Justice, (or Mukhya Nyayadhish) of the Marathas, Ram Shastri Prabhune, found Anandibai and Raghunathrao guilty of murder. A part of the letter of Raghunathrao's order to the Gardis was examined by Ram Shastri who determined that the initial order "restrain him" (tyaala dharun aana) had been changed to "kill him" (tyaala marun aana) - a difference of only one letter in the Marathi language. Raghunathrao swore that he had not ordered the murder of his nephew. It was widely believed in the palace that the author of this change was Anandibai herself.[4][5]

      Anandibai's husband was overthrown by Nana Phadanvis and 12 others in the Barabhai conspiracy. The result of this was that the one-year-old baby Madhavrao II, born to Narayanrao's widow, Gangabai (Sathe) after his death, was put on the throne, effectively putting the power in the hands of Nana Phadanvis.

      Later life

      As she and her husband were fleeing from the forces of Nana Phadanvis, she gave birth to Bajirao II on 10 January 1775 in the Dhar fort, under the control of the Pawars.[6]

      On 11 December 1783, her husband, Raghunathrao died,[7] leaving behind three sons.

      See also

      References

      1. Gune, Vithal (1996), Survey and Calendar of Marathi Documents, K.P. Bagchi, ISBN 978-81-7074-166-4, retrieved 2009-01-14
      2. Turner, O. (1904), Journal of the Bombay Branch of the Royal Asiatic Society, The Society, retrieved 2009-01-14
      3. 1 2 [dead link]|Indian express article about Shaniwar Wada
      4. Sen, Shailendra (1994), Anglo-Marath Relations during the time of Warren Hastings, Popular Prakashan, ISBN 978-81-7154-578-0, retrieved 2009-01-14
      5. Hasting, Gabriel (2004), Strangers Within the Gates, Asian Educational Services, ISBN 978-81-206-1875-6, retrieved 2009-01-14
      6. Vaidya, S.G. (1976), Peshwa Bajirao II and the Downfall of Maratha Power, Pragati Prakashan, ISBN 978-81-206-1875-6, retrieved 2009-01-14
      7. | Nashik District Gazetteer
      This information is sourced from Wikipedia, the leading online open-content collaborative (crowd-sourced) encyclopedia. Wikipedia and/or TransLiteral Foundations can not guarantee the validaity of content above and can not be held responsible for inaccuracies or libelious information within. Please see Wikipedia General Disclaimer.






Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.