उदाराम राजे देशमुख[1, 2]

Male - 1632


Personal Information    |    Sources    |    Event Map    |    All

 • Name उदाराम राजे देशमुख 
  Nickname उद्धवराव 
  Gender Male 
  Died 1632  Devgiri Fort, Maharashtra, India Find all individuals with events at this location 
  Person ID I446  Maratha Empire
  Last Modified 15 Mar 2022 

  Family सावित्रीबाई देशमुख 
  Children 
  +1. जगजीवनराव देशमुख,   d. 1658
  Last Modified 15 Mar 2022 
  Family ID F283  Group Sheet  |  Family Chart

 • Event Map
  Link to Google MapsDied - 1632 - Devgiri Fort, Maharashtra, India Link to Google Earth
   = Link to Google Earth 
  Pin Legend  : Address       : Location       : City/Town       : County/Shire       : State/Province       : Country       : Not Set

 • Sources

  1. [S25]
   ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
   वाशीमचा, याची सून रायबागन, माहूरचे देशमुख, ऋ. दे. ब्रा.[(१) श्रै. व. ४, अंक १-४, पृ. ४९, (२) शि. भा., (३) काळे व. इ.]
   उद्धवराव उर्फ उदाराम ( मोगलांचे तफचा माहूरचा किल्लेदार. (मृ. १६३२ )


   This information looks different than all other sources. All other sources mention Raibagan as Wife, but this reference mentions Raibagan as "Daughter in Law". It will be documented as "Wife" here.


  2. [S38]
   माहूरचे राजे उदाराम, Vinit Raje , (varhadnama), https://varhadnama.blogspot.com/2020/03/blog-post.html?m=1.
   मध्ययुगीन वऱ्हाडच्या राजकारणात लखुजी जाधवराव यांच्यानंतर नाव येते माहूरच्या उदाजीराम (Raja Udaram) यांचं. इसवी सनाच्या १७व्या-१८व्या शतकात वऱ्हाडात एक अनंत नावाचे कवी होऊन गेले. त्यांच्या “भक्तरहस्य” या काव्यात माहूरच्या राजे उदाजीराम यांच्या भाग्योदयाची कथा आढळते. भक्तरहस्यातील सगळाच भाग विश्वसनीय वाटत नाही. त्यामुळे यात निवडक भाग घेतलेला आहे. उदाजीराम यांचे मूळ नाव उद्धवजी रामजी. जसे मुघल कागदपत्रांमध्ये जाधवराव चे ‘जदूराय’ झाले, तसेच उद्धवजी रामजीचे ‘उदाजीराम’ झालेले आहे. सुरुवातीच्या काळात हे उदाजीराम वाशिम जवळच्या सावरगावचे कुळकर्णी होते. त्यांना फार्सी भाषेचे उत्तम ज्ञान होते. आजचे औरंगाबाद म्हणजे त्याकाळचे खडकी हे शहर अहमदनगरच्या निजामशाहीतील एक महत्त्वाचे शहर. भक्तरहस्यानुसार पद्माजी नावाच्या एका सत्पुरूषाच्या सांगण्यावरून उदाजीराम खडकी येथे आले. आपले कुळकर्णी पद सोडून खडकीला आल्यावर उदाजींनी एका अमीराचा वसिंदा म्हणजे लेखक म्हणून काम केले. खडकी मध्ये उदाजींनी प्रतिष्ठा कमावली. याच काळात त्यांनी सैनिकी शिक्षण घेतले असावे. काही काळातच त्यांनी एका अमीरामार्फत दिल्ली गाठली. दिल्लीला त्यांचे मामा सरकारी दफ्तरात कामाला होते. त्यांच्या मदतीने उदाजींनी तिथे सरकारी दफ्तरात काम मिळवले. त्यांची कार्यकुशलता थेट बादशाह अकबराच्या कानावर गेली. त्याने उदाजींना काही कामगिरी दिली. ती उत्कृष्टपणे पार पाडून त्यांनी बादशहाची मर्जी संपादन केली. काही काळ दिल्लीतच गेला.
   पुढे ई. स. १५९५-९६ मध्ये अकबराने वऱ्हाड जिंकून घेतले. त्यात माहूर हे एक अत्यंत महत्त्वाचे ठाणे होते. पण चाँद बिबीने तहाचा मान राखला नाही. आणि माहूर बालाघाट प्रांत मुघलांच्या हवाली करण्यास तिथले निजामशाही किल्लेदार विलंब करू लागले. याच काळात अकबराने उदाजींना माहूरच्या किल्ल्याची किल्लेदारी आणि वाशिमची वतनदारी दिली. उदाजींचा जनसामान्यांवर चांगला पगडा होता असा उल्लेख मुघल कागदपत्रांमध्ये सापडतो. कदाचित याचा फायदा घेण्याचा उद्देश अकबराचा असावा. किंवा उदाजींनीच बादशाह कडून किल्लेदारी मागून घेतली असावी. माहूरला त्यावेळी इंद्रजिव नावाचा राजपूत जमीनदार होता. तो लोकांस उपद्रव करित असे, असे ‘भक्तरहस्या’त कवीने म्हटले आहे. पुढे त्याची जमीनदारी काढून टाकण्यात आली. निजामशाही आणि मुघल यांच्यात वऱ्हाडासाठी संघर्ष सुरू होता. त्यात माहूर कधी निजामशाही अंमलाखाली तर कधी मुघलांच्या अंमलाखाली असे. वऱ्हाडच्या त्या प्रदेशात अराजकता माजली होती. लुटालुट आणि जाळपोळ नेहमीचा प्रकार होता. ई. स. १६०० मध्ये चाँद बिबीचा खून झाला. निजामशाही मलिक अंबराच्या अधिपत्याखाली आली.* याच घटनेच्या मागेपुढे उदाजींनी मुघल नोकरी सोडून निजामशाहीत प्रवेश केला. हळू हळू उदाजीराम पंडित निजामशाहीचे चार हजारी मनसबदार झाले आणि एक महत्त्वपूर्ण सरदार म्हणून नावारूपास आले. त्यांच्या मुलखातल्या लोकांमध्ये त्यांना मान्यता होती. निजामशाहीतील बलाढ्य सरदार लखुजी जाधवराव यांच्याशी उदाजीराम यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. जाधवराव आणि उदाजीराम यांच्यातील संबंधांवर पुढच्या काही भागांत प्रकाश पडेलच. पण वऱ्हाडच्या इतिहासात जे दोन महत्त्वपूर्ण सरदार झाले त्यात एक सिंदखेडचे राजे लखुजी जाधवराव आणि दुसरे माहुरचे उदाजीराम पंडीत हे होत. उदाजीराम हे एक अत्यंत हुशार, कार्यकुशल, प्रजाहितदक्ष पण कारस्थानी सरदार होते. त्यांची एक उत्तम प्रशासक म्हणून ख्याती होती. दानधर्मामध्ये ते दख्खन मधील सरदारांच्या अग्रभागी असत. लखुजी जाधवरावांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी बऱ्याच लढाया लढल्या आहेत. पैठण पासून मेहकर पर्यंत लखुजी जाधवरावांच्या तर मेहकर पासून माहूर पर्यंत उदाजीराम यांच्या जहागिरीचा मुलुख होता. असे जवळ जवळ अर्धे वऱ्हाड पुढे त्यांची जहागिर होते. रायबागन ही उदाजीराम पंडीत यांचीच पत्नी. श्रीशिवभारतात त्यांचा उल्लेख कवींद्र परमानंदांनी ‘उदारामश्चाग्रजन्मा ख्यातः क्षात्रेण कर्मणा’ म्हणजे ‘क्षात्रकर्मा मुळे प्रख्यात असा उदाराम ब्राह्मण’ असा केला आहे.
   दख्खनच्या मुसलमानी राजवटींमध्ये मराठ्यांना महत्त्व प्राप्त होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे मराठ्यांचे चपळ सैन्य. गनिमी कावा तंत्राचा वापर याच काळात मलिक अंबराने सुरू केला. मराठ्यांची त्याला युद्धांमध्ये मदत होत होती. याच कारणांमुळे भोसले,घाटगे, काटे, कायथ, चव्हाण, मोहिते, उदाजीराम, ई. सरदार १६ व्या शतकाच्या शेवटी शेवटी आणि १७ व्या शतकाच्या सुरुवातीला उदयास येऊ लागले.

   (*वाचा “मुघलांपूर्वीचे वऱ्हाड” वऱ्हाडनामा वर.)
   संदर्भ सूची :
   १. यशोधन - डॉ म. खु. देशपांडे यांचा निवडक लेख संग्रह, संपादक – प्रा. राम शेवाळकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई.
   २. Maasir ul Umara
   ३. Berar Under the Mughals – Md. Yaaseen Quddusi
   ४. कवींद्र परमानंद कृत श्री. शिवभारत

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.