प्रभुणीकर, अण्णाजी दत्तो[1, 2, 3, 4]

Male - 1681


Personal Information    |    Sources    |    All

 • Name प्रभुणीकर, अण्णाजी दत्तो 
  Nickname अनाजी दत्तो 
  Gender Male 
  Significant Event (EVEN) 29 Aug 1661 
  त्यांस १६६१ मध्ये महाराजांनी वाकनीस(वत्तांत लेखक) नेमले. 
  Significant Event (EVEN) 3 Apr 1662 
  १६६२ मध्ये सुरनीस (सचिव) म्हणून नेमले 
  Died Aug 1681 
  Association Bhosale, Sambhaji (Relationship: Sambhaji sentenced Anaji Datto to death) 
  Person ID I394  Maratha Empire
  Last Modified 14 Mar 2022 

  Father प्रभुणीकर, दत्तात्रय 
  Family ID F252  Group Sheet  |  Family Chart

  Family प्रभुणीकर, लक्ष्मीबाई 
  Children 
   1. प्रभुणीकर, राघो अण्णाजी
   2. प्रभुणीकर, गोदावरी
  Last Modified 9 Mar 2022 
  Family ID F253  Group Sheet  |  Family Chart

 • Sources

  1. [S25]
   ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी, गो. स. सरदेसाई, रियासतकार, (शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई).
   अनाजी दत्तो, शिवाजीच्या अष्टप्रधानांपैकीं एक सुरनीस किवा सचिव. बहुधा दे.ब्रा., राज्याच्या उभारणींत प्रमख होता. त्याचा भाऊ सोमाजी दत्तो व दुसरा व्यंकाजी दत्तो हीं नांवें शिवाजीच्या कारभारांत येतात, परंतु त्यांच्या कुटुंबाचा तपास लागत नाहीं. अनाजी दत्तोस संभाजीनें स. १६८१ त देहान्त शासन दिलें.


  2. [S26]
   केतकर ज्ञानकोश, https://ketkardnyankosh.com/., https://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-09-43-34/1559-2012-10-22-10-54-44.
   अण्णाजी दत्तो : शिवाजीच्या अष्टप्रधानांतील एक अधिकारी. सतराव्या शतकाच्या प्रारंभीं हिंदुपदपादशाहीची कल्पना मूर्त स्वरुपांत येऊं लागत आहे तोंच शहाजीचीं व शहाजीनें पाठविलेलीं वृद्ध व अनुभविक माणसें कमीकमी होऊं लागलीं तेव्हां शिवाजीच्या संग्रहांत नवीन जोमाचीं व उत्कट कळकळीचीं कांहीं स्वामिनिष्ठ माणसें गोळा झालीं. त्यांत अण्णाजी दत्तो प्रभुणीकर हा होता. हा देशस्थ ब्राह्मण असून तो इ. स. १६४७ च्या सुमारास शिवाजीस येऊन मिळाला व लहान मोठीं कामें करून त्याजजवळ राहिला. याच्याकडे संगमेश्वर तालुक्यांतील देशकुलकर्णपण होतें. अण्णाजीचा जसा पूर्ववृत्तांत उपलब्ध नाहीं तसाच त्याच्या खासगी चरित्रावर प्रकाश
   पडेल अशी माहितीहि उपलब्ध झालेली नाहीं.


   विजापूरकरांकडून विडा उचलून आलेल्या अफजलखानाबरोबर शिवाजी एकांगी सामना देण्यास तारीख १० नोव्हेंबर १६५९ रोजीं प्रतापगडावरुन खालीं उतरला त्या वेळीं अण्णाजीस शिवाजींने प्रतापगडावर जिजाई व संभाजी यांच्या संरक्षणार्थं ठेविलें होतें. अफजलखानास चीत केल्यानंतर, अण्णाजी दक्षिण कोंकणचा माहितगार म्हणून, त्यास शिवाजीनें ताबडतोब पन्हाळा किल्ला घेण्यास पुढें पाठविलें, व त्यानें “मालसावंत याचे हजारी सांगून” पन्हाळा सर करण्याचा प्रयत्न केला. नंतर तारीख २८ नोव्हेंबर १६५९ रोजीं शिवाजीनें खासा जाऊन पन्हाळा घेतला. अण्णाजींने आपली कर्तबगारी अशाच रीतीनें शिवाजीसन्निध राहून दाखविल्यामुळें व शिवाजीसहि तो हिशेबी व लेखनकुशल दिसून आल्यामुळें तारीख २९ आगष्ट १६६१ रोजीं शिवाजीनें राज्याची वाकनिशी त्यास सांगितली व पालखी दिली. वाकनिशीत खासगीचा कारभार, पत्रव्यवहार, दफ्तर संभाळणें इत्यादि दरख असत. भोजनाची तजवीज, आमंत्रणें करणें, इत्यादि कामेंहि वाकनिसासच करावीं लागत. परंतु ही वाकनिशी अण्णाजीस देण्यापूर्वीच जमिनीची पहाणी करणें, सारामहसुलाची व्यवस्था पाहणें इत्यादि राज्यांतर्गत व्यवस्थेचीं कामें दादाजी कोंडदेवाच्या मृत्यूनंतर अनुभविक म्हणून अण्णाजीस सांगितलीं जात असत व अण्णाजी दत्तोनेंहि दादाजीचीच सारापध्दत चालू ठेवून आपलें काम फारच चोख रीतीनें केलें होतें. “राज्याची चांगलीच मशागत केली यास्तव शिवाजीनें कृपाळू होऊन यास तारीख ३ एप्रिल १६६२ रोजी सुरनिशी देऊन याचा यथारीति सन्मान केला.” सुरनीस किंवा सचीव यानें राजपत्रें होतील त्यांत न्यूनाधिक अक्षर मजकूर शोध करुन नीट करावीं व तसेंच महाल, परगणे यांच्या हिशेबाचे शोध करावे; राजपत्रावर संमत करून बार चिन्ह रुजू करावें; युध्दादि प्रसंग करून राजहित तें करावें असे होतें. अण्णाजीनें गांवकामगारांवर मुळींच विश्वास न ठेवतां स्वत: सर्व गांव फिरुन सारापट्टी बसविणें वगैरे देखरेखीचें व अन्तर्व्यवस्थेचें काम चांगल्या रीतीनें केलें असलें तरी युद्धादि प्रसंग करून त्यानें स्वतंत्रपणें एखादा मुलूख मिळविला असें झालें नाही. शिवाजीनें सन १६६४ च्या जानेवारींत कोळवणांतून (ठाणें जिल्ह्यांतून) जाऊन तारीख ६ रोजीं सुरत लुटली. त्या वेळीं त्यानें अण्णाजीस बरोबर घेतले होतें. पुढें दक्षिण पादाक्रान्त करण्यास प्रतापराव गुजर वगैरे जी कांहीं खाशी मंडळी पाळविण्यांत आली त्यांत अण्णाजी होता. परंतु या सफरींतहि अण्णाजीनें कांहीं विशेष शौर्य दाखविले नाहीं. नाहीं म्हणावयास हुबळी शहर मात्र अण्णाजीनें लुटलें असल्याचा उल्लेख सांपडतो (इ.स. १६७३). हुबळी हे त्या वेळीं व्यापाराचें मुख्य ठिकाण होतें. या शहरांत बरीच लूट, सुरतेपेक्षांहि अधिक, मिळाली असावी असा अजमास आहे. परंतु इंग्रज व इतर वखारवाले आणि शिवाजी यांच्यामध्यें नंतर वाटाघाटी झाल्या त्यांवरुन असें दिसतें कीं अण्णाजीनें शिवाजीला हुबळीच्या लुटीची पूर्ण हकीकत शेवटपर्यंत कळविली नसावी. कदाचित राजापूरच्या लुटींत दाखविलेल्या अव्यवस्थितपणामुळें शिवाजीनें जबाबदार माणसांस जें शासन केलें त्यामुळें अण्णाजीकडून असे घडलें असावें. इ.स. १६६६ त शिवाजी संभाजीसह आग्र्यास दिल्लीश्वरास भेटावयास गेला त्या वेळीं शिवाजीनें आपला राज्यकारभार ज्या त्रयीवर टाकला होता तींत अण्णाजी होता. या मंडळीनीं कार्यदक्ष राहून तारीख ५ मार्च ते २० नोव्हेंबर १६६६ पर्यंत राज्याचा कारभार चांगल्या प्रकारें सांभाळिला म्हणून त्यांच्या संबंधीं “तुम्ही राज्याचे आधारस्तंभ” वगैरे बहुत प्रकारें शिवाजीनें गौरवोद्गार काढले. अण्णाजीचा बहुतेक काल सारामहसूल ठरविणें, गांवांशिवांच्या तक्रारींची चौकशी करणें, निकाल देणें यांतच जाई. अण्णाजी युद्धादि प्रसंगांत क्वचितच सामील होई. तरी देखील अण्णाजी दक्षिण कोंकणचा माहितगार म्हणून जेव्हां जेव्हां दक्षिण भागांत युद्धप्रसंग निघे तेव्हां तेव्हां त्यास बरोबर पाठविण्यांत येत असे. इ.स. १६५९ त मिळविलेला पन्हाळा विजापूरकरांनीं इ.स. १६६२ त परत घेतला होता व नंतर मराठयांनीं आपल्या अंमलाखालीं आणलेल्या मुलुखांत खवासखान अधिकाधिक व्याप करूं लागला म्हणून शिवाजीनें दक्षिणेंतील बंदोबस्तीचें मुख्य ठिकाण जो पन्हाळा किल्ला तो घेण्याचें सन १६७३ त ठरविलें, व “अण्णाजीपंतास तो पुन्हा भेद करून घ्यावा” अशी आज्ञा करून “बाबाजी नाईक पुंडे विजापुरास वकील होता त्यास बोलावून माघारीं आणलें. कोंडाजी फर्जद यास पालखी वगैरे देऊन गौरव केला व गुप्त सलजमसलत सांगून व त्याच्या बरोबर गणाजी व मोत्याजी रवलेकार मामा यांच्या हाताखालीं बरेच लोक देऊन रवाना केलें. अण्णाजी राजापुरीं तीन दिवस आधीं म्हणजे तारीख २ मार्च १६७३ रोजीं जाऊन हेरांकडून बातमी आणणें वगैरे योजना करीत होता. तोंच तारीख ५ मार्चला कोंडाजी वगैरे मंडळी जाऊन पोहोंचली व त्यांनीं त्याच दिवशीं रात्रीं निबिड अंधारांत किल्ल्यावर छापा घालून सर्वत्र दाणादाण केली. यावेळीं अण्णाजी पंडित हा पिछाडीचें रक्षण करण्यासाठीं म्हणून सैन्यासह त्यांच्या पाठीमागें मोठया अरण्यांत लपून राहिला होता. तारीख ६ रोजींहि बर्‍याच चकमकी उडून किल्ला कोंडाजीनें ताब्यांत घेतला व जासुदाबरोबर विजयपत्रिका शिवाजीस रवाना केली. अण्णाजी पंडित देखील हर्षभरित होत्साते धांवत आले.” नंतर आठ दहा दिवसांनीं शिवाजी पन्हाळयावर आला तोंपर्यंत अण्णाजी तेथेंच राहिला होता. याप्रमाणें पन्हाळा पुन्हां एकदां घेतला तो सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत मराठयांकडेच राहिला. नंतर याच वर्षात राज्याभिषेक होण्याच्या पूर्वी शिवाजीनें अष्टप्रधानांचे कारभार वाटून दिले तेव्हां त्यांत अण्णाजीकडे चेऊलपासून दाभोळ, राजापूर, कुडाळ, बांदे व फोंडे अंकोलपर्यंत म्हणजे सर्व दक्षिण कोंकणचा कारभार सांगितला होता. शिवाय जमिनी पाहून कायम सारा करणें वगैरे जमीनमहसुलाचें काम पूर्वीप्रमाणें त्याच्याकडेच कायम ठेविलें. अण्णाजीस रत्नागिरी तालुक्याचें देशपांडेपण व कोल्हापूर इलाख्यातील भूधरगडाजवळील सामानगडची सबनिशीहि दिली होती. अण्णाजीनेंच सामानगड बांधिला असें म्हणतात. अण्णाजीकडे दक्षिण कोंकणचा कारभार असल्यामुळें सर्व समुद्रकिनारा त्याच्याकडेच असे व त्यामुळे त्याचा यूरोपीयन वसाहतवाल्यांशीं नेहमीं संबंध येई. व ते त्यास अण्णाजी पंडित किनार्‍याचा सुभेदार (व्हाइसराय ) असें म्हणत. तारीख ५ जून १६७४ रोजीं शिवाजीस राज्याभिषेक झाला त्या वेळीं अण्णाजीकडे राज्यान्तर्गत व्यवस्थेचें काम असल्यामुळें त्यासच राजावर छत्र धरण्याचा मान मिळाला व त्या प्रसंगीं त्याचा बादली वस्त्रें, पोषाख, कंठी, चौकडा, तुरा, शिरपेंच, शिकेकट्यार, ढाल, तरवार, हत्ती, घोडा, ऐसे देऊन सन्मान करण्यांत आला. अण्णाजीस पालखी खर्च मिळून सालिना १०,००० होनांची किंवा महिना ३००० रुपयांची नक्त नेमणूक होती. अण्णाजी राजपत्रांवर जो आपला शिक्का मोर्तब करी त्यांतील मुख्य शिक्का अष्टकोनी असून, मोठा व लांबट होता व त्यांत पुढीलप्रमाणें चार ओळी होत्या. (१) श्री शिवचरणी (२) निरंतर दत्त (३) सुत अनाजिपं (४) त तत्पर. जोडावर मारण्याचा किंवा लेखनसीमेचा शिक्का लहान व वर्तुलाकार असून त्यांतील मजकूर (१) लेख (२) नावधि रे (३) धते असा आहे. इ. स. १६७४ नंतर शिवाजीनें पुन्हां सर्व पहाणी करण्याचें ठरविलें व त्यांतच अण्णाजीचीं पुढील ४-५ वर्षें गेलीं. दरम्यान माळव्यावर मात्र अण्णाजीस पाठविलें होतें. इ. स. १६७८ त शिवाजी कर्नाटकांत जावयास निघाला त्या वेळीं मागें अण्णाजीस राज्यसंरक्षणार्थ ठेविलें होतें. अण्णाजी बहुतेक रायगडींच असे. तो जेव्हां गांवें पहाण्यास जात असे तेव्हां मागें त्याचा तालिक सुरनिशीचें सर्व काम पाही.

   गांवकामगार वगैरे जमिनीची पहाणी चुकीची करीत व त्यामुळे विशेषत: राज्याचेंच नुकसान होत असे. म्हणून अण्णाजीनें बरीच सक्त मेहनत घेऊन व स्वत: गांवोगांव फिरुन पहाणी केली व सारा बसविला. अशा रीतीनें राज्याचा वसूल बराच वाढला, अन्तर्व्यवस्था नीट झाली व अण्णाजीच्या उत्कर्षासहि ह्यायोगें अधिकाधिक भर पडत चालली. परंतु या कारणानेंच त्या वेळच्या कित्येक थोर व कर्तृत्ववान् लोकांचें व अण्णाजीचें वितुष्ट आलें व हणमंते वगैरे मंडळी जमीनमहसुलाचे व गांवांशिवांचे तंटे “महाराजांनी जातीनें निवडावे” अशी मागणी करूं लागले. याचा परिणाम असा झाला कीं, सर्व जमिनीची पहाणी पुन्हां करून सारापट्टी ठरवावी म्हणून शिवाजीनें आज्ञा केली व त्याप्रमाणें राज्याभिषेकानंतर पहाणीस सुरुवात झाली. या पहाणींतहि दादाजीचीच जमीनीची तक्षिमा म्हणजे प्रत ठरविण्याची व मोजणीची पद्धति स्वीकारलेली होती. परंतु ॠतुमानाप्रमाणें कमीअधिक आंखूड होणार्‍या दोरींऐवजीं राजहस्तानें पांच हात व पांच मुठी लांबीच्या काठीचें माप चालू केलें. शिवाजी मूळचा आजानुबाहु म्हणून या मापाबद्दल कुरकुर करणें शक्य नव्हतें व शिवाय राजहस्त. उत्पन्नाच्या दोन पंचमांश सारापट्टी हेंच प्रमाण कायम ठेविण्यांत आलें, परंतु गल्याऐवजीं नगदीमध्यें सारा घेण्याची पध्दत चालू केली, शिवाय यावेळीं जी सारापट्टी मुक्रर केली ती कायम म्हणून समजण्यांत आली. पडीक जमिनीवरहि सारा बसविल्यानें पडीक जमिनीची लागवड होऊं लागली. जेथें जमिनी मोकळया पडल्या होत्या तेथें नव्या वसाहती करवून व लागवडीसाठी बियाणें, गुरें व पैसाहि २ वर्षांच्या मुदतीनें देण्यांत येऊन लागवड करण्यांत आली. दुष्काळांतहि बियाणें, गुरें वगैरे देण्यांत आल्यामुळें कायम सारापध्दतीबद्दल तक्रारीस जागा राहिली नाहीं. सारापट्टी नवीन बसवितांना अण्णाजीनें वेळोवेळीं गांवागांवांस आज्ञापत्रें लिहिलीं त्यांवरून असें दिसतें कीं सारापट्टी बसविणें ती प्रथम कारकुनांनी व गांवकामगारांनीं गांवांतील चार शिष्टांच्या संमतीनें व मागील दोन तीन वर्षांच्या उत्पन्नाच्या मानानें कायम करावी व त्यांत गांवांतील प्रमुख गृहस्थांनीं मदत करावी; व अशा तर्‍हेनें सारा ठरविणें वगैरे झाल्यानंतर गांवाचें लिहून यांवें व नंतर अण्णाजीनें स्वत: जाऊन राजहितास बाध येत नाहीं व गांवांत तक्रारी नाहींत असें पाहून सारापट्टी कायम करावी. परंतु असे करण्यांत व्यक्तिहिताकडे अण्णाजीस डोळेझांक करावी लागली व त्यामुळें तो कांही व्यक्तींच्या द्वेषास पात्र झाला. मोरोपंत पिंगळे पेशवा हाच मुख्यत: सर्व राज्यास जबाबदार असल्यामुळें अण्णाजीच्या विरुद्ध बरेच वेळां निकाल द्यावा लागे व शिवाजीसहि तो मान्य असे. त्यामुळें अण्णाजी मोरोपंताचा द्वेष करूं लागून मोरोपंत व अण्णाजी यांच्यामध्यें वैमनस्य आले. शिवाजीच्या राज्याभिषेकप्रसंगीं मोरोपंतानें जो थोडासा विरोध दाखविला त्यामुळे अण्णाजीस मोरोपंताचा उघड उघड द्वेष करण्यास सवड सांपडली होती. अण्णाजीचा सर्व वेळ एकंदरींत राज्यांतर्गत व्यवस्थेंत गेल्यामुळें तो कित्येक थोर लोकांच्या नुकसानीस कारणीभूत झाला होता. याचा परिणाम असा झाला कीं, अण्णाजीचा दरारा जितका आहे म्हणून वाटत होता तितकेच त्याच्याविरुद्ध सर्व प्रजा व लहानथोर कामगार झाले होते.

   हिंदु लोकांच्या वारसी हक्कांतच सर्वनाशी गृहकलहाचें बीजारोपण झालेलें आहे. नुसत्या उत्कर्षाच्या ओलाव्यानें बीज जेथल्यातेथेंच नाश पावतें, हें खरें. परंतु थोडयाहि उत्कर्षाच्या ओलाव्यास एखाद्या कर्तृत्ववान पुरुषाची ऊब मिळतांच हें बीज अंकुर घेतें. सर्वगुणसंपन्न व विनयशील अशा सईबाईच्या मृत्यूनंतर व राजारामाच्या जन्माबरोबर उत्पन्न झालेलें गृहकलहाचें भूत जिजाबाईच्या करडया अंमलाखालीं पूर्णपणें गाडून गेलें होतें तेंच शिवाजीच्या राज्याभिषेकोत्सवामुळें व संभाजीला युवराजपदीं पाहातांच वर उसळी घेऊं लागलें व जिजाबाईच्या मृत्यूनंतर उच्छृंखल होऊन शिवाजीच्या घरांत उघडपणें खेळूं लागलें. अण्णाजी हा मूळचा महत्वाकांक्षी व बुद्धिवान पंडित. परंतु त्याच्या अंगांत शौर्य किंवा युद्धनैपुण्य नसल्यामुळें तो पहिल्यापासून कारस्थानी. याला या भुताचा वास शिवाजीसन्निध व बहुतेक रायगडींच राहिल्यानें तेव्हांच लागला व यानें अर्थातच त्या कालीं सबळ असलेल्या सोयराबाईचा पक्ष धरिला. अण्णाजीनें सोयराबाईवर लवकरच आपला पगडा चांगलाच बसविला. संभाजीविरुद्ध कारस्थानें करवून त्याला नालायक बनविण्यास सोयराबाईस सर्वांशीं मदतगार हा एवढाच सरकारकून असल्यानें सोयराबाईनेंहि त्याचाच पुरस्कार केला. हा सोयराबाईंचा गुप्तकट शिवाजी कर्नाटकच्या स्वारीवर गेल्यानंतर अधिकच जोरावला व त्यानें संभाजीला त्याच्या बायकोसह उठवून लावलें. शिवाजी परत आल्यानंतर त्याला संभाजी उठून गेल्याची बातमी कळली तेव्हां त्याने संभाजीस परत आणण्याचा प्रयत्न केला. या बळावत चाललेल्या गृहकलहास कांहीं तरी तोड काढून हिंदुपद पादशाहीचें संरक्षण करावें या विवंचनेंत शिवाजी असतां त्यास आजार झाला व त्या आजारांत शिवाजीचा अंतसमय जवळ येत आहे असें दिसतांच संभाजीच्या बंदोबस्ताच्या व इतर योजना गुप्त रीतीनें चालू झाल्या. या प्रसंगीं मोरोपंत वगैरे थोर थोर मंडळी शिवाजीनें मुद्दाम बोलावून आणली होती व बाळाजीहि जवळ होता. परंतु या थोर मंडळींचीं मनें हिंदुपदपादशाहीच्या प्रतापसूर्याच्या अस्ताचलावरून फांकणार्‍या किरणांत इतकी व्यग्र होऊन गेलीं होतीं व त्यांना या राजधानींतील व राजघराण्यांतील गृहकलहापासूनदूर राहिल्यानें इतकें भांबावून गेल्यासारखें झालें कीं त्यांना क्षुद्रबुद्धि व सापत्नभावानें प्रेरित झालेल्या सोयराबाईचा कावा व महत्वाकांक्षी अण्णाजीची स्वार्थपरायणता अगदीं दुर्बोध झाली. त्या स्वामिनिष्ठ सरकारकुनांना किंवा प्रधान मंडळाला सोयराबाई व अण्णाजी यांच्या विरुद्ध जातां येईना. इकडे अण्णाजीनें शिवाजीच्या आजार वाढत आहे ही बातमी संभाजीस न कळेल अशी पूर्ण खबरदारी घेतली व पुढें शिवाजीच्या मृत्यूनंतरहि म्हणजे त्याच्या मृत्यूची वार्ता नजर कैदेंतील ( त्यावेळीं समजल्या गेलेल्या ) संभाजीस तो पूर्ण बंदिवान केला जाईपर्यंत कळूं नये अशी व्यवस्था केली. शिवाजीच्या मृत्यूनंतर १८ दिवसांनींच म्हणजे तारीख २१ एप्रिल १६८० रोजी अण्णाजीनें सर्वाधिकार आपल्याकडे घेऊन नऊ दहा वर्षांच्या राजारामास `मंचकारोहण’ करविलें व मोरोपंतांशीं`तह’ करून तो संभाजीस कैद करण्यास रायगडाहून निघाला. अण्णाजीच्या या वरचढ वर्तणुकीनें मोरोपंताला आपल्या भावी आयुष्याचा संशय वाटूं लागून त्याच्या मनांतील अढी साहजिकच द्दढ होऊं लागली. इकडे जनार्दनपंतास व हंबीररावासहि अण्णाजीनें-बाळाजीनें नाकारिलें तरी-त्याच्या मुलाकडून जबरदस्तीनें लिहवून आज्ञापत्रें पाठविलीं होतीं; खरें पाहिलें तर हंबीरराव याचा दर्जा व राज्यांतील वजन यांकडे लक्ष दिलें तर अण्णाजीनें सर्व कारभार त्याच्या संमतीनेंच करावयास पाहिजे होता. परंतु स्वामिनिष्ठ हंबीररावास सोयराबाईचा पक्ष मान्य होणार नाहीं म्हणून अण्णाजीची खात्री होती. याकरितां अण्णाजीनें त्याच्या संमति वगैरेच्या भानगडींत न पडतां सोयराबाईस हाताशीं धरून, स्वार्थांधतेमुळे आपल्या स्वत:च्या दरार्‍यावर व सामर्थ्यावर फाजील विश्वास ठेवून राजारामाचें बाहुलें पुढें केलें व सर्व राज्यकारभार आपणाकडे ठेवण्याची महत्वाकांक्षा धरिली. यामुळें सर्व राजमंडळ व कारकून वगैरे अण्णाजीबद्दल बरेच शंकित झाले. मोरोपंत व जनार्दनपंत हणमंते तर त्याचा पूर्वीपासूनच द्वेष करीत होते, व हंबीररावहि अण्णाजीची वर्तणूक अपमानकारक जाणून जास्तच चिडीस पेटला. जिकडे हंबीरराव तिकडे सेना व प्रजा अशी वस्तुस्थिति. तेव्हां जनार्दनपंत लागलीच अण्णाजीविरुद्ध बाजू धरुन संभाजीस जाऊन मिळाला, व हंबीररावानेंहि संभाजीशीं व इतर थोर मंडळीशीं पत्रव्यवहार करून अण्णाजी, मोरोपंत व प्रल्हादपंत यांस कराडहून जाऊन वाटेंत धरिलें व संभाजीपाशीं नेले. पुढें हंबीररावानें कुलफौज एक करून राज्य संभाजीस दिलें व संभाजी जूनमध्यें रायगडास येऊन राज्य करू लागला, व त्यानें सोयराबाईस ठार करून राजारामास कैद केले. अशा रीतीनें अण्णाजीचा डाव फसला. पुढे ४-५ महिन्यांनीं म्हणजे सप्टेंबर महिन्यांत संभाजीनें अण्णाजीस बंधमुक्त केलें व मजमूहि त्याजकडे दिली परंतु अण्णाजी झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप न पावतां उलट अपमानाबद्दल सूड घेण्याचा हट्ट धरून होता. अवरंगजेबाचा मुलगा अकबर संभाजीकडे आश्रयार्थ पळून आला त्याजजवळ अण्णाजीनें शिरके मंडळीस चिथाऊन संभाजीविरुद्ध कारस्थान केलें. तें अकबरानें संभाजीच्या भीतीस्तव स्वत:च संभाजीस कळविलें. त्यामुळें संभाजीस फार क्रोध येऊन त्यानें शिरक्यांचें शिरकाण करविलें व अण्णाजीबरोबर इतरहि मातबर मंडळीस परळीखालीं कैद करून हत्तीच्या पायाखाली तुडविलें. अशा रीतीनें या पुरुषाचा सन १६८१ च्या आगष्ट महिन्याच्या अखेरीस शेवट झाला. परंतु त्यानें केलेल्या कारस्थानाचे अनिष्ट परिणाम मात्र मराठयांना व महाराष्ट्राला कायमचे भोगावे लागले.

   सारांश, शिवकालीं जितकी स्वधर्माविषयी जागृति झाली होती त्याच्या दशांशानेंहि स्वराज्यविषयी प्रेम किंवा राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली नव्हती. मुसुलमान व हिंदू यांमधील तेढ अवरंगजेबाच्या दक्षिणेंतील स्वारीनंतर जितकी तीव्रतेनें भासूं लागली तितकी ती शिवकालीं नव्हती. इंग्रजांच्या हाताखाली सेवक म्हणून वागण्यांत ज्याप्रमाणें अजूनहि समाधान मानलें जातें त्याप्रमाणेंच मुसुलमान राजाची नोकरी पतकरण्यांत समाधान किंबहुना मोठेपणा त्यावेळीं वाटे; आणि ज्या काळीं सेव्यसेवकधर्मच प्रधान असतो त्याकाळीं स्वराज्य किंवा स्वधर्मासाठी स्वार्थत्याग केला जाणें शक्य नसतें. अष्टप्रधानाच्या मिळकती व मोठाले पगार यांकडे पाहिलें तर त्या वेळचे कर्तृत्ववान् म्हणून ठरलेले पुरुषहि केवळ विकत घेतले जात असेंच म्हणावें लागेल. अवरंगजेबासारखा शत्रु हिंदुपदपादशrहीचा समूळ नाश करण्याकरितां बाहेर पडला असतां सवाईशूर संभाजीला दूर सारून राजारामासारख्या बाहुल्याला पुढे करणार्‍या स्वार्थसक्त अण्णाजीचें वर्तन चमत्कारिक वाटेल इतकेंच नव्हे तर शिवाजीच्या हाताखालीं अनुभवी व कार्यदक्ष समजल्या गेलेल्या अण्णाजींने आपल्या चुकींबद्दल पश्चाताप न पावतां हटवादीपणानें पुन्हां तितकीच भयंकर चूक करून हिंदुपदपादशाहीच्या चिंधडया उडविण्यास प्रवृत्त होणें कोणालाहि तिरस्करणीय वाटल्याशिवाय रहाणार नाहीं. परंतु त्यावेळीं परिस्थितीच अशी होती कीं पुढार्‍यांनाहि स्वार्थ व स्वामिनिष्ठा यांखेरीज अन्य संस्कृतीचा संसर्ग झाला नव्हता. मात्र या घनघोर चुकीचा परिणाम असा झाला की अण्णाजीच्या पहिल्या कारस्थानांत अडकल्या गेलेल्या प्रधान मंडळीवरील संभाजीचा विश्वास कायमचा नष्ट झाला. कित्येक मृत्युमुखीं पडले व जे राहिले ते उदासीन झाल्यामुळें नामशेष होऊन गेले. यायोगेंकरून महाराष्ट्राची कुवत ऐनप्रसंगीं नाहीशीं झाली व संभाजीसारख्या वीराला आनुवंशिक मुत्सद्दयांच्या अभावीं स्वधर्माचा बचाव करणें कठिण झालें. जिकडे तिकडे बेबनाव झाला व शिवाजीनें व इतर थोर मंडळीनी सतत अर्धे शतक आपलें रक्त सांडून व अहनिंश झटून केलेला हिंदुपदपादशाहीचा सर्व प्रयत्न अण्णाजीनें केवळ स्वार्थासाठी हटवादीपणानें वायां दवडिला. परंतु शिवाजीनें तयार केलेल्या महाराष्ट्रांत औरंगजेबाच्या इस्लामी तरवारीनें सर्रास सर्व मराठ्यांचे रक्त पडूं लागतांच महाराष्ट्राच्या नव्या पिढींत स्वराज्यविषयक भावनांचें बीजारोपण होऊन त्यांच्यांत स्वार्थ त्यागाची जागृति व परधर्मीयांविषयीं तेढ कायमची उत्पन्न झाली व मराठयांना जिवंत राहण्यासाठीं नंतर २५ वर्षेंपर्यंत आपले सर्वस्व खर्ची घालून रक्त सांडावें लागलें.

   - वा. सी. बेंद्रे.


  3. [S27]
   इतिहासाच्या पाऊलखुणा, (Facebook), https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna., https://www.facebook.com/groups/itihasachya.paulkhuna/permalink/2252777415008800/ .
   सारंग विठ्ठल गोंधळेकर

   १६ ऑगस्ट १६६२: अण्णाजी दत्तो यांना सुरनिसी!
   अण्णाजींचे पुर्ण नाव अण्णाजी दत्तो प्रभुणीकर. यांचा पहिला उल्लेख १६५९साली अफजलखान प्रसंगी आढळतो. त्यावेळी खानाची भेट घेतली त्याच्या आदल्या दिवशी रात्री शिवाजीराजांनी मुत्सद्यांची बैठक बोलावली व त्यात भेटीला जाताना काय नियोजन व तयारी करावी याविषयी चर्चा केली. या मुत्सद्यांत अण्णाजींचे नाव आहे. इस १६६१ मधे शिवाजीराजांनी अण्णाजींना स्वराज्याचे वाकनीस (वाकेयानवीस) केले. मात्र पुढच्याच वर्षी भाद्रपद शुद्ध १२ या तिथीला म्हणजेच १६ ऑगस्ट १६६२ रोजी अण्णाजींना स्वराज्याची सुरनिसी दिली. या पदालाच मराठीत सचिव असेही म्हणत. राज्याभिषेकानंतर शिवाजीराजांनी मंत्र्यांसाठी एक नियमावली तयार केली, ज्याला कानुजाबता असे म्हणत त्यात सचिवाचे काम पुढीलप्रमाणे दिले आहे
   *'सचिव यांनी राजपत्रे शोध करून अधिक, उणे अक्षर मजकूर शुद्ध करावा. युद्धप्रसंग करून तालुका स्वाधीन होईल तो रक्षून आज्ञेत वर्तावे. राजपत्रावर चिन्ह संमत करावे'*
   थोडक्यात महत्वाची शासकीय कागदपत्रे तपासणे, लिहिणे, त्यातील चुका दुरूस्त करणे ही सचिवाची कामे होत. प्रत्येक पत्र सचिवाच्या नजरेखालून जात असे. त्या पत्रांवर त्याचा सहीशिक्का आवश्यक असे.
   अनेक महत्त्वाच्या मोहिमांत अण्णाजींचा सहभाग होता. इस १६७० मधे तानाजी मालुसरेंना जेव्हा सिंहगड काबीज करण्यासाठी पाठवले त्याच सुमारास महाराजांनी अण्णाजींना आज्ञा केली कि 'तुम्ही राजकारण यत्न करून किल्ले घ्यावे'
   १६७०च्या दशकात इंग्रजांशी पत्रव्यवहार, १६७३ मधे कोंडाजी फर्जंद सोबत पन्हाळ्याची मोहिम, फोंडा किल्ल्यावर दोन वेळा मोहिम अशा काही मोहिमांत अण्णाजींचा सहभाग होता.
   इस १६७३ मधे शिवाजीराजांनी स्वराज्याचे विकेंद्रीकरण करताना चौलपासुन दाभोळ, राजापूर, कुडाळ, बांदे व कारवारपर्यंतची कोकणपट्टी अण्णाजींच्या स्वाधीन केली. इस १६७६ मधे दक्षिणदिग्वीजय मोहिमेवर जाण्याआधी महाराजांनी त्यांच्यामागे महत्वाच्या लोकांकडे जबाबदार्या दिल्या त्यात अण्णाजींकडे रायगडाच्या दक्षिणेकडील प्रदेश सोपविला. राज्याभिषेकासमयी अण्णाजी आग्नेय दिशेला शिवाजीराजांच्या मस्तकी छत्र धारण करून उभे होते.
   बाळाजी चिटणीस:
   ज्या दिवशी अण्णाजींना सुरनिसी दिली त्याच दिवशी शिवाजीराजांनी बाळाजी आवजी चित्रे यांना स्वराज्याची चिटणीसी दिली. हे बाळाजी चिटणीस शिवाजीराजांना कसे आणि कुठे भेटले याची माहिती रोमांचक आहे.
   जंजिर्याचे सिद्दी किनारपट्टीच्या जवळ जी गावे असायची तिथल्या लोकांवर अत्याचार, जबरदस्ती करायचे. बाळाजींच्या वडिलांना म्हणजे आवजी हरी चित्रे यांना सिद्द्याने पोत्यात घालुन समुद्रात फेकुन दिले व बाळाजी यांना त्यांचे दोन भाऊ व आईबरोबर गुलाम म्हणून विकुन टाकले. मात्र त्या सर्वांच्या सुदैवाने त्यांना विकत घेणारी व्यक्ती ही त्यांचे मामा विसाजीपंत तुंगारे हे होते (इस १६४८). त्यानंतर बाळाजी व त्यांचे कुटुंब राजापूर येथे वास्तव्याला होते.
   इस १६६१ मधे शिवाजीमहाराज आदिलशाही मुलुख जिंकत असताना कोकणातील राजापूर येथे आले होते. कस कोण जाणे पण बाळाजी शिवाजीराजांच्या संपर्कात आले. बाळाजींचे बोलणे गोड होते आणि त्यांचे हस्ताक्षर सुंदर होते आणि हे पाहुनच महाराजांनी बाळाजींना स्वराज्याची चिटणीसी दिली आणि बाळाजींचे नशीब फळफळले.
   राजकीय दप्तर बाळाजींकडे आले. परकीय वकिलातीची कामेही आली. राज्याभिषेकाला बाळाजी चिटणीस शिवाजीराजांच्या उजव्या बाजूला उभे होते. राज्याभिषेकानंतर महाराजांनी चिटणिसाला मंदिल, झगा, विजार, दुपटा, दुमजल अशी वस्त्रे व मोत्याची कंठी, चौकडा व शिरपेच असे दागिने दिले. इस १६७३ मधे बाळाजींना महाराजांनी पालखीचा मानही दिला.
   असे हे दोघे अण्णाजी सचिव व बाळाजी चिटणीस. यांनी स्वराज्याची व शिवाजीराजांची इमानेइतबारे सेवा केली. मात्र पुढे संभाजीराजांच्या काळात गडबड झाली व सोयराबाई व राजाराम पक्षाला मिळुन कट करण्याच्या आरोपाखाली संभाजीराजांनी हे दोघे व इतर काही जणांना ठार मारले. कोण चूक कोण बरोबर? यापेक्षाही ही झालेली घटना खुप दुर्दैवी होती. या घटनेपुर्वी काही वर्षे या दोघांचे संभाजीराजांचा जिवलग मित्र कवी कलश याच्या बरोबरही वितुष्ट निर्माण झाले होते.
   मात्र असे असले तरी, पुढे बाळाजींचा पुत्र खंडोजी संभाजीराजांशी एकनिष्ठ राहिला. एवढच नाही तर एका प्रसंगात त्याने संभाजीराजांना संकटातुन बाहेरही काढले.
   १६ ऑगस्ट १६६६:
   या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळच्या दरबारात नऊ वर्षांचे संभाजीराजे रामसिंगबरोबर दरबारात गेले. बादशहा औरंगजेबाने रामसिंगाला हुकुम केला, 'सीवा मुघल मनसब कबूल करेल अशा तर्हेने त्याचे मन वळव. त्याचे नातेवाईक व इतर लोक यांना हुजूर बोलवावे. त्याने स्वत:चे किल्ले देऊन टाकावेत. त्याची इथुन काबूलकडे नेमणूक करीन.'
   हे शिवाजीराजांना काबुल कडे पाठवण्याचा डाव औरंगजेबाने तीन महिन्यात दुसर्यांदा रचला. हा वरचा हुकुम वाचल्यावर कळते की, औरंगजेबाचा हा शिवाजीराजांना निर्वाणीचा इशारा होता. मात्र राजांनीही औरंगजेबाला एक निरोप (अंतिम इशारा) दिला जो सायंकाळच्या दरबारात रामसिंगने त्याला सांगितला
   'आपणास आपल्या वतनावर असू द्यावे मग जो हुकूम होईल तो मान्य करू'
   तीन महिन्यात अनेक डाव प्रतिडाव टाकुन झाले होते. आता महाराज एक काटशह देणार होते. दुसर्याच दिवशी........।
   संदर्भ: शककर्ते शिवराय, ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा
   :- सारंग


  4. [S28]
   WIKI.Annaji_Datto_Sachiv, Wikipedia, (Wikipedia), WIKI.Annaji_Datto_Sachiv.

   Annaji Datto Sachiv
   Surnavis and Sachiv
   Maratha Empire
   Monarch Shivaji
   Personal details
   Spouse Lakshmibai[1]
   Relations Somaji Datto (Brother)
   Children
   • Ragho Annaji[2]
   • Godavari

   Annaji Datto Sachiv was the Sachiv (Chief Secretary) in the Ashta Pradhan (Council of 8) mandal of the Maratha Empire during the rule of Shivaji.[3]

   Early life

   Before joining the services of Shivaji, Annaji Datto was a Kulkarni of Sangameshwar. He joined Shivaji's administration in 1647.[4]

   Career

   Campaign on Panhala and Pawangad

   Annaji Datto was assigned the job of capturing the Panhala fort after the Afzal episode.[5] In 1659, Annaji captured the Panhala fort and Pawangad fort from the Mughals.[6]

   Minister under Shivaji

   Land reform

   In 1667, Shivaji appointed Annaji to the task of land revenue reform in areas under the Swarajya.He improved upon Malik Amber's revenue system and introduced a new one. Annaji's efforts led to a new system of lower government claim on farm produce of 2/5.His work involved accurate land measurement, bringing new land under cultivation, and measures to reduce exploitation of the illiterate cultivators by the hereditary village officials such as the Patil and Kulkarni.[7][8] Annaji Datto also carried out a survey known as Annaji Datto's Dhara.[9] He improved upon Malik Amber's revenue system and introduced a new one, which is considered to be one of the great land-marks in the deve- lopment of agriculture in Maharashtra in medieval time

   Sarkarkun for Konkan division

   According to Subhasad Bhakhar, the Maratha Empire of Shivaji was divided into three parts, each under a cabinet minister, called a Sarkarkun. Annaji Datto Sachiv, Moropant Trimbak Pingle, and Dattoji Pant were appointed sarkarkun.[10][11] As sarkarkun, Annaji Datto controlled the Konkan territory, including Choul. Dabhol, Rajapur, Kudal, Bande, Phonda, and Koppal. This division between territories was called Talghat or Southern division.[12]

   Conflict with Sambhaji

   Shivaji's eldest son and presumptive heir, Sambhaji, was sent to the fort of Panhala by his father,due to the conflict between him and ashtpradhan mandal.[13][14][15] However, in December 1678 Sambhaji left the fort and defected to the Mughals for a year under a secret plan of shivaji maharaj and sambhaji raje, but then returned home when he learnt of a plan by Dilir Khan, the Mughal viceroy of Deccan to arrest him and send him to Delhi.[16] Upon returning home, Sambhaji was again put under surveillance at Panhala by his father due to asthpradhan mandal influenced by anaji datto[17][18][14][19] However, Shivaji soon fell ill and died in April 1680. The news of Shivaji's death reached Sambhaji at Panhala within eleven days.[20]

   Conspiracy with Soyarabai

   At the time of Shivaji's death, Annaji conspired with Shivaji's widow, Soyarabai to lure the Council of ministers (ashtapradhan mandal), into electing her then ten year old younger son Rajaram to the throne of Maratha swarajya with Soyarabai as the regent.[21][22] On 21 April 1680, arrangements were made to make Rajaram's position secure. The coronation of Rajaram I was performed by Annaji Datto and a few of Rajaram's supporters.[23]

   Soyarabai and Minister's proposed Sambhaji for the division of the Maratha Empire. When their proposal of the division of the Swarajya was turned down by Sambhaji, the adherents of the cause of Rajaram, Peshwa Moropant Pingle, Annaji Datto and others marched against Sambhaji. However, Sambhaji quickly won over the support of the Maratha army. He arrested those who had marched against him on the way to Panhala between 19 May and 2 June 1680. Sambhaji marched on Raigad and gained possession of the capital on 18 June 1680. He promptly put Rajaram, Soyarabai in close confinement.

   Execution

   Annaji and other ministers involved in the conspiracy were arrested and either executed or confined. Annaji was however released after a period. Later in 1681 when Prince Akbar, Aurangzeb's rebel son was given asylum by Sambhaji, Annaji and several members of the Shirke clan (of Yesubai) promised the Deccan to Akbar in exchange for leaving a small kingdom for Rajaram. Akbar refused to be a party to this conspiracy and betrayed these conspirators to Sambhaji who quickly executed Annaji, his brother Somaji, a large number of the Asthapradhan members and members of the Shirke family in August 1681.[24][25]

   References

   1. Appasaheb Ganapatrao Pawar (1969). ताराबाईकालीन कागदपत्रे, Volume 1. शिवाजी विद्यापीठ. p. 43. A grant from Shivaji to Ragho Annaji, the son and Laxmibai, the widow of Annaji Datto. The document mentions that this Watan was formerly given by Shivaji the Great to Annaji Datto
   2. Śālinī Pāṭīla (1987). aharani Tarabai of Kolhapur, c. 1675-1761 A.D. S. Chand & Co. p. 174. When Lakshmibai and Annaji Datto's son, Ragho Annaji, told Tarabai about the wretched conditions through which they had passed after Annaji's death, and requested Tarabai to restore to them the Desh Kulkarni Vatan
   3. Apte 1974, p. 42.
   4. Deopujari 1973, p. 255.
   5. Kulakarni 2006, p. 61.
   6. Fryer 1992, p. 168.
   7. Kulkarni, G. T., 1976. Land Revenue and Agricultural Policy of Shivaji – An Appraisal. Bulletin of the Deccan College Research Institute, 35(3/4), pp.73-82.
   8. Kantak, M. R. “THE POLITICAL ROLE OF DIFFERENT HINDU CASTES AND COMMUNITIES IN MAHARASHTRA IN THE FOUNDATION OF SHIVAJI’S SWARAJYA.” Bulletin of the Deccan College Research Institute, vol. 38, no. 1/4, 1978, pp. 40–56. JSTOR, http://www.jstor.org/stable/42931051. Accessed 21 Sep. 2022.
   9. Apte 1974, p. 43.
   10. Singh 1998, p. 93.
   11. Kulkarni, A.R., 1990, January. Maratha Swarajya: Its Extent and Income. In Proceedings of the Indian History Congress (Vol. 51, pp. 321-325). Indian History Congress.
   12. Grewal 2005, p. 216.
   13. Gordon, Stewart (1993). The Marathas 1600–1818 (1. publ. ed.). New York: Cambridge University. p. 80. ISBN 978-0-521-26883-7. Retrieved 5 June 2016.
   14. 1 2 J. L. Mehta (1 January 2005). Advanced Study in the History of Modern India: Volume One: 1707–1813. Sterling Publishers Pvt. Ltd. ISBN 978-1-932705-54-6.
   15. Govind Sakharam Sardesai (1946). New History of the Marathas. Phoenix Publications. p. 251.
   16. Bhave, Y.G. (2000). From the death of Shivaji to the death of Aurangzeb : the critical years. New Delhi: Northern Book Centre. p. 35. ISBN 81-7211100-2.
   17. Gordon, Stewart (1993). The Marathas 1600–1818 (1. publ. ed.). New York: Cambridge University. p. 80. ISBN 978-0-521-26883-7. Retrieved 5 June 2016.
   18. Maharashtra State Gazetteers:Satara. Gazetteers Dept Director of Government Publications, Madras State. 1963. p. 92.
   19. Govind Sakharam Sardesai (1946). New History of the Marathas. Phoenix Publications. p. 230.
   20. Ec Ratnākara Rāva (1997). Govind, Shivaji's Warrior. Orient Blackswan. p. 128. ISBN 9788125007746.
   21. Śālinī Pāṭīla (1987). Maharani Tarabai of Kolhapur, c. 1675-1761 A.D. S. Chand & Co. p. 16.
   22. Maharashtra State Gazetteers, Volume 22. Director of Government Printing, Stationery and Publications, Maharashtra State. 1969. p. 79.
   23. Vaidya 2000, p. 89.
   24. Kincaid, C.A. and Parasnis, D.B., 1922. History of the Maratha people. Vol. II: From the death of Shivaji to the death of Shahu. Oxford University Press, London. Page=9
   25. The Quarterly Review of Historical Studies, Volumes 7-9. Institute of Historical Studies. 1968. p. 181.

   Bibliography

   This information is sourced from Wikipedia, the leading online open-content collaborative (crowd-sourced) encyclopedia. Wikipedia and/or TransLiteral Foundations can not guarantee the validaity of content above and can not be held responsible for inaccuracies or libelious information within. Please see Wikipedia General Disclaimer.


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.